Stocks to Buy Esakal
अर्थविश्व

2022 मध्ये 'हा' स्टॉक देणार बंपर परतावा, काय सांगताहेत तज्ज्ञ?

शिल्पा गुजर

तुम्ही 2022 मध्ये तुमच्या पोर्टफोलिओसाठी मजबूत स्टॉक शोधत असाल, तर सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड (CDSL) हा एक चांगला पर्याय असू शकतो.

Superstar Stock for 2022: जर तुम्ही 2022 मध्ये तुमच्या पोर्टफोलिओसाठी मजबूत स्टॉक शोधत असाल, तर सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड (CDSL) हा एक चांगला पर्याय असू शकतो. या सरकारी कंपनीचा ग्रोथ आउटलुक चांगला आहे आणि येत्या काळात मजबूत परतावा अपेक्षित आहे. टेक्निकल एनॉलिस्ट सिमी भौमिक यांनी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडमध्ये (CDSL) 2022 साठी मजबूत स्टॉक म्हणून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. भौमिक यांनी 2200 ते 2250 रुपये टारगेट निश्चित केले आहे.

CDSL बाबत काय म्हणत आहेत एक्स्पर्ट ?

सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड (CDSL) मध्ये सध्या काही आणि तर काही मार्केट करेक्शन नंतर खरेदी करणेही योग्य ठरेल असे टेक्निकल एनॉलिस्ट सिमी भौमिक म्हणाल्या. हा स्टॉक सर्वात वाईट परिस्थितीतही 1300-1290 ची पातळी तोडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्यापेक्षा जास्तीत जास्त 10-12 टक्क्यांनी घसरण्याची अपेक्षा आहे. जे खराब बाजार स्थितीत होऊ शकते. पण त्याचवेळी येत्या एका वर्षात हा स्टॉक किमान 50 टक्के परतावा देईल. येत्या 2022 साठी 2200 ते 2250 चे टारगेट असल्याचे त्या म्हणाल्या.

CDSL: 2021 मध्ये 185% पेक्षा जास्त तेजी

2021 मध्ये तुम्ही CDSL च्या रिटर्न चार्टवर नजर टाकली तर सध्या 185 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या शेअरने वर्षभरात 1,734 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली. 31 डिसेंबर 2021 रोजी या शेअरची किंमत 1517 रुपये होती. गेल्या 5 वर्षात हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरत सुमारे 480 टक्के परतावा दिला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Resign: राजकीय उलथापालथ! माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; क्रीडा खात्याची जबाबदारी कुणाकडे?

Video: परिस्थितीमुळे क्रिकेट सोडायण्याचा विचार, पण वडिलांची खंबीर साथ; IPL 2026 संधी मिळालेल्या ठाण्याच्या पोराची भावनिक कहाणी

Latest Marathi News Live Update : माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा

Vasai Virar Election : वसई-विरार महापालिकेसाठी शिवसेना-भाजप युती जाहीर; जागावाटपावर मात्र संभ्रम कायम!

Narayangaon Crime : वारुळवाडी येथे मध्यरात्री घरफोडी; सहा तोळे सोनं व २५ तोळे चांदीचे दागिने लंपास!

SCROLL FOR NEXT