अर्थविश्व

व्होडाफोन कंपनीने  आणला नवीन प्लॅन

पीटीआय

मुंबई - रिलायन्स ‘जिओ’च्या बाजारातील प्रवेशामुळे तीव्र झालेल्या स्पर्धेमुळे इतर दूरसंचार कंपन्यांना रोजच नवनवे ‘प्लॅन’ आणि ‘ऑफर’ जाहीर कराव्या लागत आहेत. ‘व्होडाफोन’ने नुकताच एक नवा प्लॅन सादर केला आहे. यामध्ये ३४९ रुपयांच्या मोबदल्यात युजरला १.५ जीबी डेटा मिळणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये युजरला अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. हा प्लॅन २८ दिवसांसाठी वैध असणार आहे. आधी याच प्लॅनमध्ये ग्राहकांना १ जीबी डेटा देण्यात येत होता. आता त्यात आणखी वाढ करण्यात आली आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये युजरला रोमिंगही मोफत देण्यात आलेले आहे. मात्र, अमर्यादित कॉलिंग मोफत, असा दावा कंपनीने केला असला तरी रोज २५० मिनिटे आणि आठवड्याला १ हजार मिनिटे मोफत मिळणार आहेत. 

भारती एअरटेलनेही अशाच प्रकारचा प्लॅन ग्राहकांसाठी जाहीर केला होता. एअरटेलच्या प्लॅनमध्येही १.५ जीबी इंटरनेट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मेसेजेस देण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT