Share Market Sakal
अर्थविश्व

कॅश मार्केटचे दोन शेअर्स तज्ज्ञांचे फेव्हरेट! कमी वेळेत होईल जास्त कमाई

शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांनी दोन शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

शिल्पा गुजर

शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांनी दोन शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

शेअर बाजारात (Share Market) मंगळवारी घसरणीनंतर रिकव्हरी दिसून आली. त्याचबरोबर काही सेक्टर्स सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळेच शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांनी दोन शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. विकास सेठी यांना Alicon Castalloy आणि Star Healt मध्ये गुंतवणूक (Investment) करायचा सल्ला दिला आहे.

Alicon Castalloy :

Alicon Castalloy ही देशातील सर्वात मोठी अॅल्युमिनियम कास्टिंग फाउंड्री असल्याचे शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी म्हणाले. ही कंपनी 50 वर्षांपासून व्यवसाय करत असून तिचे एकूण 13 प्लांट आहेत. एनकेई कॉर्पोरेशन या जपानी कंपनीसोबतही त्यांचे टेक्निकल टायअप (JV) आहे. त्यांची Alicon Castalloy मध्ये 40 टक्के हिस्सेदारी आहे. हा शेअर चांगला व्यवसाय करत असल्याचे सेठींनी सांगितले.

Alicon Castalloy

- सीएमपी (CMP) - 817.65 रुपये

- टारगेट (Target) - 850 रुपये

- स्टॉप लॉस Stop Loss - 795 रुपये

स्टार हेल्थ (Star Health) :

स्टार हेल्थ (Star Health) देशातील सर्वात मोठी खासगी आरोग्य विमा कंपनी आहे, तर रिटेल हेल्थ इंश्युरन्स मार्केटमध्ये तिचा 31 टक्के वाटा आहे. 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचीही स्टार हेल्थमध्ये 14.9 टक्के भागीदारी आहे. नुकताच त्याचा आयपीओही आला. स्टार हेल्थ स्टॉकचा डाउनसाइड रिस्क खूपच कमी आहे.

स्टार हेल्थ (Star Health)

- सीएमपी (CMP) - 774.10 रुपये

- टारगेट (Target) - 800 रुपये

- स्टॉप लॉस Stop Loss - 750 रुपये

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT