शेअर बाजारात कमाईसाठी आम्ही तुमच्यापर्यंत सतत तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शेअर्सची लिस्ट देत असतो. आताही सेठी फिनमार्टचे एमडी आणि मार्केट एक्सपर्ट विकास सेठींनी काही शेअर्सची निवड केली आहे. विकास सेठींनी कॅश मार्केटमधून 2 स्टॉक्स निवडले आहेत. त्यांनी श्री दिग्विजय सिमेंट (Shree Digvijay Cement) आणि वेसुवियस इंडियाला (Vesuvius India ) अशी या दोन शेअर्सची नावं आहेत. (Cash market these 2 stock is the favorite of experts)
सध्या विकास सेठी सिमेंट क्षेत्राबाबत बुलिश आहेत. त्याचबरोबर अर्थसंकल्पात ज्या घोषणा झाल्या त्यामुळे हे क्षेत्र येत्या काळात चांगली कामगिरी करेल असा विश्वास सेठी यांना आहे. श्री दिग्विजय सिमेंट (Shree Digvijay Cement) ही प्रायव्हेट इक्विटी फंडद्वारे प्रमोटेड कंपनी आहे. या कंपनीचे फंडामेंटल्स चांगले आहेत आणि तिची क्षमता 12 लाख टन आहे. रिटर्न ऑन इक्विटी 18 टक्के आहे. त्याचे ब्रँड नेम कमल आहे. विशेष म्हणजे कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. गेल्या 5 वर्षांपासून त्याचा पीएटी (Profit After Tax) चा सीएजीआर (Compound annual growth rate) सुमारे 48 टक्के आहे.
सीएमपी (CMP) - 74.20 रुपये
टारगेट (Target) - 80 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 67 रुपये
विकास सेठी यांनी दुसरा स्टॉक Vesuvius India निवडला आहे. ही एमएनसी कंपनी आहे, जिची मूळ कंपनी युके स्थित आहे.
सीएमपी (CMP) - 1139 रुपये
टारगेट (Target) - 1200 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 1130 रुपये
Vesuvius India मेटल कंपनीला सेवा देते. सप्टेंबर तिमाहीत कंपनीकडे 19 कोटी पीएटी (करानंतरचा नफा) होता, जो गेल्या वर्षीच्या 12 कोटी रुपये होता. त्याचे शेअर्स सध्या स्वस्त व्हॅल्युएशवर ट्रेड करत आहेत. याही कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. यामध्ये FII आणि DII चाही सुमारे 24.36 टक्के हिस्सा आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.