Chinmay Barve writes about indian share market investment finance money management  sakal
अर्थविश्व

दिशा शेअर बाजाराची

२० वर्षांच्या ऐतिहासिक आकडेवारीनुसार ‘निफ्टी’ निर्देशांक प्रत्येक जानेवारी महिन्यात १३ वेळा तोट्यात संपला आहे.

चिन्मय बर्वे

ऐतिहासिकदृष्ट्या प्रत्येक जानेवारी महिना हा निर्देशांकासाठी कामगिरीच्या दृष्टिकोनातून खूपच कठीण महिना ठरला आहे. कारण गेल्या २० वर्षांच्या ऐतिहासिक आकडेवारीनुसार ‘निफ्टी’ निर्देशांक प्रत्येक जानेवारी महिन्यात १३ वेळा तोट्यात संपला आहे.

जानेवारी महिन्यातील ‘निफ्टी’ परतावा गेल्या चार वर्षांत नकारात्मक होता. मागील वर्षी ‘निफ्टी’चा परतावा भारतीय रुपयाच्या दृष्टीने चार टक्के होता; परंतु चलन बाजारातील उलथापालथीमुळे वर्षभरात अमेरिकी डॉलरच्या दृष्टीने निर्देशांक सहा टक्के घसरल्याने परदेशी गुंतवणूकदारांचे नुकसान झाले.

जुलै २०२२ पासून, ‘निफ्टी’ त्याच्या पाच आठवड्यांच्या सरासरीपेक्षा वरच्या स्तरावर टिकून आहे आणि ‘निफ्टी’च्या पाच आठवड्यांची सरासरी आणि २६ आठवड्यांची सरासरी यातील सकारात्मक फरक स्पष्टपणे दर्शवितो, की निर्देशांकाचा मध्यम मुदतीचा कल अजूनही वरच आहे.

‘निफ्टी’ची तांत्रिक आलेख रचना साप्ताहिक आणि मासिक यांसारख्या विस्तृत कालावधीच्या तांत्रिक आलेखावर सकारात्मक दिसते. कोणतेही मोठे अर्थव्यवस्थेशी संबंधित आणि युद्धजन्य परिस्थितीसारखे धक्के नसतील, तर मध्यम कालावधीत ‘निफ्टी’ हळूहळू १८,९०० च्या सर्वकालीन उच्चांकाकडे जायचा प्रयत्न करेल, अशी शक्यता वाटते.

मध्यम अवधीच्या दृष्टिकोनातुन खालच्या बाजूस, १७,४०० ते १७,६००च्या मध्ये ‘निफ्टी’ला चांगली आधार पातळी आहे, असे तांत्रिक आलेख दर्शवतो. अल्प ते मध्यम कालावधीत, ‘निफ्टी’ला ज्या प्रमुख आव्हानांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे, ती म्हणजे मंदीची वाढती भीती. चीनमध्ये वेगाने पसरणारी कोविड प्रकरणे ज्यामुळे पुन्हा एकदा जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा धोका आहे.

सावधगिरी आवश्‍यक

बाजारातील उच्च आणि समृद्ध असे सापेक्ष मूल्यमापन, चीन हळूहळू पूर्वपदावर आल्यास परकी गुंतवणूकदारांचा पैसा उत्तर आशियाच्या दिशेने गुंतवणुकीसाठी जाण्याची शक्यता, देशांतर्गत उपभोग-केंद्रित क्षेत्रातील संभाव्य कमाई-अंदाजातील घट आणि आगामी अर्थसंकल्पाभोवती बाजारात येऊ शकणारी संभाव्य अस्थिरता या घटकांमुळे भारतीय शेअर बाजाराबाबत नजीकच्या काळात धोरणात्मक सावधगिरी बाळगणे योग्य ठरेल.

देशांतर्गत आघाडीवर वाहन विक्रीचे आकडे, कंपन्यांचा तिमाही कमाई हंगाम, महागाईदर, व्याजदरांबाबत ‘आरबीआय’ची रणनीती आणि केंद्रीय अर्थसंकल्पाकडून गुंतवणूकदारांच्या अपेक्षा यासारख्या प्रमुख घटकांचा अल्पावधीत बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जागतिक उच्च महागाईच्या पार्श्वभूमीवर परकी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारावर वर लक्ष केंद्रित करू शकतात.

कारण भारतातील महागाईचा दर हा वाढलेला असला, तरी इतर देशांच्या आणि विशेषतः विकसित देशांच्या तुलनेत तो कमी आहे. अमेरिकेच्या मागील तीन मंदीच्या चक्रांच्या विश्लेषणानंतर असे दिसून आले आहे, की मंदीनंतर पुढील १२ महिन्यांत भारतीय बाजाराने अमेरिकेच्या तुलनेत अधिक परतावा दिला आहे.

कंपन्यांचे मूल्यांकन दीर्घकालीन सरासरीच्या खाली येण्याची शक्यता दिसत नाही. कारण देशांतर्गत गुंतवणूकदारांना पेन्शन, भविष्य निर्वाह निधी, विमा निधी आणि पद्धतशीर गुंतवणूक योजनांमधून २० अब्ज डॉलरचा ओघ लाभू शकतो.

बाजाराचा कल वाढीचाच

मध्यम ते दीर्घ कालावधीत, वित्तीय, औद्योगिक, सतत मागणी असणाऱ्या वस्तू, धातू आणि सिमेंट यांसारख्या क्षेत्रांनी चांगली कामगिरी करणे अपेक्षित आहे, तर माहिती तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, अशी अत्यावश्यक नसलेली उत्पादने जी व्यक्ती फक्त तेव्हाच खरेदी करू शकतात जेव्हा त्यांच्याकडे जास्त रोख असेल आणि वाहने यांसारखी क्षेत्रे सुस्त राहण्याची शक्यता आहे.

थोडक्यात सांगायचे, तर अल्पावधीत, बाजारासाठी काही चिंता जरूर आहेत; परंतु मध्यम ते दीर्घ कालावधीत बाजाराचा कल तांत्रिकदृष्ट्या आणि मूलभूतपणे वरचाच दिसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India in WC Final: थँक्स टू Jesus! भारताला फायनलमध्ये पोहोचवल्यावर जेमिमा रॉड्रिग्ज भानविक झाली; म्हणाली, शतकापेक्षा भारत जिंकणं महत्त्वाचं होतं...

IND beat AUS in Semi Final: विजयी धाव अन् जेमिमा रॉड्रिग्जसा अश्रू अनावर, हरमनप्रीत कौरही रडली; मुंबईच्या पोरीने मोडला गौतम गंभीरचा विक्रम Video Viral

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

farmer Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीबाबत महायुती सरकारचा मोठा निर्णय! खुद्द फडणवीसांनीच केली घोषणा, म्हणाले...

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

SCROLL FOR NEXT