LIC IPO sakal media
अर्थविश्व

LIC IPO : 'जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी'; मग किंमत कमी का? : सुरजेवाला

उद्या एलआयसीचा आयपीओ लाँच केला जाणार आहे, त्यापूर्वी हा हल्लाबोल करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत मोदी सरकार LIC विकत असून हे अतिशय दुर्भाग्य असल्याचे म्हटले आहे. यावेळी 30 कोटी पॉलिसी धारकांच्या विश्वासाचे मूल्यांकन कमी का आहे? असा सवाल देखील काँग्रेसतर्फे उपस्थित करण्यात आला आहे. उद्या (दि.4) रोजी एलआयसीचा आयपीओ लाँच केला जाणार आहे त्यापूर्वी हा हल्लाबोल करण्यात आला आहे. (Congress Attack On Modi Government Before LIC IPO Launching )

एलआयसी 14 लाख लोकांना रोजगार देत असून, यामुळे 120 कोटी लोक प्रभावित होत असल्याचे म्हटले असून, ट्वीट करत 'जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी' म्हणत एवढी घाई का? असा सवाल उपस्थित करत 30 कोटी एलआयसी पॉलिसी धारकांच्या विश्वास आणि आत्मविश्वासाची किंमत इतकी कमी का? असा प्रश्नदेखील सुरजेवाला यांनी ट्वीट करत सरकारला विचारला आहे. विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कंपनीने अधिकृतपणे IPO जाहीर केला असून, एलआयसीचा हा आयपीओ ४ मे ते ९ मे या कालावधीत सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे.

दरम्यान, विमा क्षेत्रातील प्रमुख कंपनी एलआयसीने मंगळवारी सांगितले आहे की, आयपीओ लॉचिंगच्या एका दिवसआधी मुख्यतः देशांतर्गत संस्थांच्या नेतृत्वाखालील अँकर गुंतवणूकदारांकडून 5,627 कोटींपेक्षा जास्त रक्कम गोळा केल्याचे म्हटले आहे. तर, दुसरीकडे भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठा IPO असल्याचे सांगत यातील 3.5 टक्के स्टेक कमी करून 21,000 कोटी उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT