Share Market Share Market
अर्थविश्व

नव्या कोरोनाचा Stock Market ला फटका; लॉकडाऊनची भीती

दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवीन प्रकार B.1.1.529 आढळल्यानंतर भारत सतर्क झाला आहे

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोनाचा नवीन विषाणूचा (Coronavirus) प्रकार आढळल्यामुळे बीएसई सेन्सेक्स (Stock Market Fall) शुक्रवारी १,६८८ अंकांपर्यंत घसरला. भारतच नाही तर अमेरिकेचा शेअर बाजारही कोसळला. शेअर बाजार निर्देशांक एसएंडपी ५०० २.२७ टक्क्यांनी घसरला. सप्टेंबरच्या अखेरीस त्याची सर्वांत वाईट परिस्थिती आहे. तर डाऊ जोन्स औद्योगिक सरासरी ९०५ अंकांपेक्षा अधिक घसरली. नॅस्डॅक कंपोझिटही २.२३ टक्क्यांनी घसरला.

दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवीन वेरिएंड आढळून आला आहे. यामुळेच युरोपियन युनियनने दक्षिण आफ्रिकेतून विमान प्रवास निलंबित केला आहे. याचा फटका शेअर बाजारालाही बसला आहे. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स १,६८८ अंकांपर्यंत घसरला. यामुळे गुंतवणूकदारांचे ७.३५ लाख कोटींचे नुकसान झाले. बीएसईचा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स १,६८७.९४ अंकांनी म्हणजेच २.८७ टक्क्यांनी घसरून ५७,१०७.१५ वर बंद झाला. व्यवहारादरम्यान, तो 1,801.2 अंकांनी किंवा 3.06 टक्क्यांनी घसरला होता. बाजारातील घसरणीसह, BSE सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 7,35,781.63 कोटी रुपयांनी घसरून 2,58,31,172.25 कोटी रुपयांवर आले.

कोरोनाचे नवीन रूप काय आहे?

दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवीन प्रकार B.1.1.529 आढळल्यानंतर भारत सतर्क झाला आहे. केंद्र सरकारने राज्यांना सतर्कता वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. द. आफ्रिका व्यतिरिक्त बोत्सवाना, हाँगकाँगमध्येही B.1.1.529चे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरातील तज्ज्ञ याला मोठा धोका मानत आहेत. त्यामुळेच आफ्रिकन देशांची उड्डाणे बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

सात आफ्रिकन देशांच्या प्रवासावर निर्बंध

इस्रायलने सात आफ्रिकन देशांच्या प्रवासावर निर्बंध लादले आहेत. इस्रायली सरकार आफ्रिका, लेसेथो, बोत्सवाना, झिम्बाब्वे, मोझांबिक, नामिबिया आणि इस्वाटिनी या देशांना लाल यादीत टाकण्यात आले आहे. त्याच वेळी, यूकेने सहा आफ्रिकन देशांच्या हालचालींवर बंदी घातली आहे. तेथील सरकारने या देशांची सर्व उड्डाणे बंद केली आहेत.

लॉकडाऊनची भीती

कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानंतर लोकांमध्ये पुन्हा लॉकडाऊनची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत युरोपीय देशांनीही कोविड-१९ बूस्टर लसीकरण वाढवण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच नियमांमध्येही कडकपणा आणले आहे. स्लोव्हाकियानेही दोन आठवड्यांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT