Vijay Mallya 
अर्थविश्व

विजय मल्ल्याला पहिल्याच दिवशी दणका; संपत्तीचा होणार लिलाव

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नऊ हजार कोटींची फसवणूक केल्याचा तसेच मनी लाँडरिंगचा आरोप असलेल्या विजय मल्ल्याला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जोरदार दणका बसला आहे. ‘फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018’अंतर्गत पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने एसबीआयसह अनेक बँकांना विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करून तिचा लिलाव करून विकण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयातअपील करण्यासाठी विजय मल्ल्याला १८ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. उच्च न्यायालयाने पीएमएलए न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्यास बँकाना मल्ल्याच्या संपत्तीचा लिलाव करून पैसे परत मिळविण्याचा मार्ग लवकर मोकळा होईल.  दरम्यान, डेट रिकव्हरी ट्रिब्यूनलच याबाबतचा निर्णय घेऊ शकतो, असा आक्षेप मल्ल्याच्या वकिलांनी घेतला होता. मात्र तो आक्षेप नाकारण्यात आला. तसेच ईडीनेही या वसुलीवर काहीच आक्षेप नसल्याचं कोर्टाला सांगितलं होतं. त्यामुळेही कोर्टाने मल्ल्याची संपत्ती वसूल करण्याची बँकांना परवानगी दिली आहे.

किंगफिशर एअरलाइन्सचा प्रमुख असलेल्या विजय मल्ल्यावर 9 हजार कोटींची फसवणूक केल्याचा तसेच मनी लाँडरिंगचा आरोप आहे. 2012 साली किंगफिशर एअरलाईन्स सुरु केल्यानंतर अति-महत्वाकांक्षेने विजय मल्ल्या अडचणीत सापडला होता. परिणामी मल्ल्याला बँकांकडून कर्ज घेण्याशिवाय परिरय उरला नाही. मात्र कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्यानंतर मल्ल्याने इंग्लंड मध्ये आश्रय घेतला आहे. विभाज्य मल्ल्याकडे इंग्लंडचे नागरिकत्व असल्याने तेथील न्यायालयात त्याच्या भारतातील प्रत्यार्पणाविषयीचा खटला सुरु आहे.

विजय मल्ल्यावर 16 बँकांचे मिळून 9000 कोटींचे कर्ज

बँकेचे नाव                                     रक्कम (कोटींमध्ये)
स्टेट बँक ऑफ इंडिया -                     1600
पंजाब नॅशनल बँक -                          800
आयडीबीआय बँक -                           800
बँक ऑफ इंडिया -                             650
बँक ऑफ बडोदा -                              550
युनायटेड बँक ऑफ इंडिया -                430
सेंट्रल बँक ऑफ इंडिया -                     410
युको बँक -                                       320
कॉर्पोरेशन बँक ऑफ इंडिया -               310
सेंट्रल बँक ऑफ मैसूर -                      150
इंडियन ओव्हरसीज बँक -                   140
फेडरल बँक -                                      90
पंजाब सिंध बँक -                                60
एक्सिस बँक -                                     50

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT