Covid 19 impact, DMart, Business 
अर्थविश्व

कोरोनामुळे डीमार्टला मोठा फटका; तिमाहीच्या उत्पन्नात कोट्यवधीची घट

सुशांत जाधव

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडून या विषाणूचे वेगाने होणारे संक्रण रोखण्यासाठी  देशात लॉकडाउनसारखा कठिण निर्णय सरकारने घेतला. लॉकडाउनमुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा आवाक्यात आणण्यात यश आल्याचा दावाही करण्यात येत आहे. पण या काळात उद्योग-व्यवसाय पूर्णत: कोलमडला आहे. रिटेल साखळीतील एक मोठं नाव असलेल्या डी'मार्टचा उद्योग अक्षरश: बसला आहे. डीमार्टने जारी केलेल्या तिमाहीच्या रिपोर्टनुसार, कंपनीला 88 टक्के तूट सहन करावी लागली. कोविड 19च्या प्रभावापूर्वी डी मार्टची उलाढाल ही 323 कोटीच्या घरात होती. कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे  यात तब्बल 40 कोटींची घसरण झाली आहे.   

देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा वेगाने वाढत आहे. याचा मोठा आर्थिक फटका सुपर मार्केटला बसला आहे, असे  सुपर मार्ट लिमिटेडचे कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नेविल नोरोन्हा यांनी म्हटले आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत कंपनीला मोठे नुकसान झाल्याचेही त्यांनी म्हटलंय. जून 2019 च्या अखेरीस कंपनीला 5 हजार 826 कोटी इतके उत्पन्न मिळाले होते. यंदाच्या तिमाहीत यात 32 टक्के घट झाली असून केवळ  3,933 कोटी उत्पन्न मिळाले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.   

व्यवसाय मॉडेलमध्ये आम्ही खर्च कार्यकुशलतेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे व्यवसायाला तुलनेने कमी नुकसान सहन करावे लागले, असेही त्यांनी सांगितले. कोरोनाजन्य परिस्थितीत कडकडीत लॉकडाउन असताना मुंबईसह अन्य शहरात DMart Ready App च्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देण्यात आली. यावेळी होम डिलिव्हरीच्या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. लॉकडाउनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर डी मार्ट खुली करण्याची परवानगी मिळाल्यावर ही सेवा बंद करण्यात आली, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 
  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rated Today: आठवड्याच्या शेवटी सोनं स्वस्त! उच्चांकापासून ₹31 हजारांनी घसरलं; ताजा भाव पाहा

IND vs PAK Final: भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली! वैभव सूर्यवंशीसह ‘या’ खेळाडूंना Playing XI मध्ये संधी; पण पाकच्या कॅप्टनसोबत हात मिळवला का?

Miraj Incident : तीन मजली इमारतीवरून पडून दीड वर्षांचे बाळ गंभीर मिरज येथे मंगळवार पेठेतील घटना

Hidden Lakes in India: तलावाच्या काठावरचं हे जग पाहिलंय का? भारतातील ५ ठिकाणं पाहून थक्क व्हाल, लगेच कराल ट्रिप प्लॅन

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

SCROLL FOR NEXT