Share-Market 
अर्थविश्व

Covid 19 Impact on Share Market: सेन्सेक्स 50 हजारांवर

प्रमोद सरवळे

मुंबई - सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टिच्या (Nifty) निर्देशांकात सत्राच्या सुरुवातीला मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं. सेन्सेक्स आणि निफ्टिच्या निर्देशांकात मंगळवारी सकाळच्या सत्रात तब्बल 1 टक्क्याहून अधिक वाढ झाली. भारतासह (India) जगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसत आहे. त्याचा परिणाम शेअर मार्केटवरही (Share Market) होताना दिसतोय. गेल्या चार दिवसांपासून भारतातील कोरोना (Corona) रुग्णांची संख्या कमी होत असून शेअर मार्केटवर सकारात्मक असा परिणाम होत आहे.

मंगळवारी सकाळी सेन्सेक्समध्ये 640 अंशांची वाढ झाली. यामुळे सेन्सेक्सने विक्रमी 50 हजारांचा टप्पा पार केला. तर निफ्टितही तब्बल 193 अंशांची वाढ झाल्यानं निर्देशांक 15 हजारांच्या वर पोहोचला.

गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे नवीन 2 लाख 63 हजार इतके रुग्ण सापडले. गेल्या आठवड्यात हाच आकडा तीन ते चार लाखांच्या दरम्यान होता. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला तो तीन लाखांच्या आत आल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टिचे निर्देशांक वाढल्याचं दिसतं. एका बाजुला नवीन रुग्णांचा आकडा कमी होत असला तरी मृत्यूची संख्या मात्र अद्याप घटलेली नाही. तर सक्रीय रुग्णांची घटणारी संख्या हीसुद्धा दिलासा देणारी बाब आहे.

एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल), बजाज फायनान्स आणि हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (एचडीएफसी) यांच्या निर्देशांकात आज वाढ दिसली. यामुळेच आज सेन्सेक्समध्ये विक्रमी उसळी पहायला मिळाली. या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत वाढ दिसून आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT