Credit Card sakal
अर्थविश्व

Credit Card अपग्रेड करण्याआधी जाणून घ्या फायद्याच्या गोष्टी

आजकाल लोक क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. बँका आणि वित्तीय कंपन्याही कमी शुल्कात लोकांना क्रेडिट कार्ड देत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

आजकाल लोक क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. बँका आणि वित्तीय कंपन्याही कमी शुल्कात लोकांना क्रेडिट कार्ड देत आहेत.

गेल्या १० ते १५ वर्षांत बँकिंगमध्ये प्रचंड आणि क्रांतिकारी बदल झाले. एक काळ असा होता की लोक पैसे काढण्यासाठी बँकांबाहेर लांबच लांब रांगेत उभे राहायचे. मात्र, तंत्रज्ञानात बदल झाल्याने बँकिंग व्यवस्थेत अनेक नव्या सुविधांची भर पडली. यामध्ये नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय पेमेंट अशा अनेक नव्या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. आजकाल लोक क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर करत आहेत. बँका आणि वित्तीय कंपन्याही कमी शुल्कात लोकांना क्रेडिट कार्ड देत आहेत.

अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी क्रेडिट कार्डच्या मोठ्या सवलतीच्या ऑफरही देण्यास सुरुवात केली आहे. लोक संपूर्ण महिन्यात क्रेडिट कार्डने सहज खरेदी करतात आणि महिन्याच्या शेवटी ते बिल भरतात. अनेक वेळा कंपन्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड अपग्रेड्स देतात. त्यामुळे क्रेडिट कार्ड अपग्रेड म्हणजे काय आणि क्रेडिट कार्ड अपग्रेड करताना आपण कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे हे सविस्तरपणे जाणून घेऊयात.

क्रेडिट कार्ड अपग्रेड म्हणजे काय?

जेव्हा आपण एखाद्या बँकेकडून किंवा कंपनीकडून पहिल्यांदा क्रेडिट कार्ड घेतो, तेव्हा ते आपल्याला बेसिक क्रेडिट कार्ड देतात. यानंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवू शकता. क्रेडिट कार्ड अपग्रेडवर मर्यादा वाढवण्याबरोबरच नवीन फीचर्सही जोडले जातात. पण, त्याचबरोबर बँकही तुम्हाला जास्त शुल्क आकारते. त्यामुळे अनेक वेळा विचार न करता क्रेडिट कार्ड अपग्रेड केल्यास तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता.

क्रेडिट कार्ड अपग्रेड करताना या गोष्टी लक्षात ठेवा-

- आपला खर्च आणि कमाई योग्य प्रकारे तपासल्यानंतरच क्रेडिट कार्ड अपग्रेड करण्याचा निर्णय घ्या. कधीकधी, लोक इतरांना पाहतात आणि क्रेडिट कार्ड अपग्रेड करतात ज्याची त्यांना आवश्यकता नसते.

- यामुळे पुढे तो कर्जाच्या जाळ्यात अडकतो. त्यामुळे या अपग्रेडची गरज आहे की नाही हे तपासा.अन्यथा, नंतर क्रेडिट कार्डचे जास्त चार्जेसमुळे तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता.

- क्रेडिट कार्ड अपग्रेड करताना कार्डवरील व्याजदर नक्की तपासा. अधिक सुविधा असलेल्या क्रेडिट कार्डमध्येही व्याजदर अधिक आकारला जातो, हे जाणून घेऊया. त्यामुळे आधी याबाबत योग्य माहिती मिळवा आणि मगच क्रेडिट कार्ड अपग्रेड करा.

- क्रेडिट कार्ड अपग्रेड करताना रिवॉर्ड पॉईंट्स जाणून घेणे देखील खूप महत्वाचे आहे.

- कार्ड अपग्रेड करण्याआधी शॉपिंग, फ्युएल रिचार्ज आदींमध्ये किती रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील हे तपासून पाहा. त्या सर्वांची तपासणी करूनच निर्णय घ्या.

- बँकेने सक्ती केल्यावर केवळ क्रेडिट कार्ड घेऊ नका. क्रेडिट कार्ड अपग्रेड करण्याचा निर्णय आपला स्वत:च असावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT