Shaktikant Das Sakal
अर्थविश्व

Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सी बंदीवर RBI गव्हर्नर यांचे सूचक विधान; म्हणाले, क्रिप्टोकरन्सी हा फक्त...

देशात आणि जगात येणार्‍या मंदीच्या बातम्यांदरम्यान क्रिप्टोकरन्सीने पुन्हा एकदा नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Cryptocurrency : देशात आणि जगात येणार्‍या मंदीच्या बातम्यांदरम्यान क्रिप्टोकरन्सीने पुन्हा एकदा नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. यावेळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बंदी घालण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

शक्तिकांता दास यांनी शुक्रवारी क्रिप्टो चलनावर पूर्ण बंदी घालण्याच्या त्यांच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला.

ते म्हणाले की, क्रिप्टो 'जुगाराशिवाय दुसरे काही नाही' आणि त्यांचे 'मूल्य केवळ एक भ्रम आहे'. अशा चलनांना विरोध करण्यासाठी RBI ने अलीकडेच स्वतःचे डिजिटल चलन ई-रुपी स्वरूपात सादर केले आहे.

गव्हर्नर म्हणाले की, प्रत्येक मालमत्ता, प्रत्येक आर्थिक उत्पादनाचे काही अंतर्निहित मूल्य असणे आवश्यक आहे, परंतु क्रिप्टोच्या बाबतीत कोणतेही मूळ मूल्य नाही.

हेही वाचा : पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

क्रिप्टोच्या मार्केट कॅपमध्ये झालेली वाढ हे केवळ आभास आहे. अगदी स्पष्टपणे सांगायचे तर, हा जुगार आहे. आम्ही आमच्या देशात जुगार खेळण्यास परवानगी देत ​​नाही आणि जर तुम्हाला जुगार खेळण्याची परवानगी द्यायची असेल तर त्याला जुगार समजा आणि जुगाराचे नियम सेट करा.

हे मान्य करावे लागेल की, क्रिप्टो हे आर्थिक उत्पादन नाही. देशात आणि जगात येणार्‍या मंदीच्या बातम्यांदरम्यान क्रिप्टोकरन्सीने पुन्हा एकदा नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी क्रिप्टो चलनावर पूर्ण बंदी घालण्याच्या पुनरुच्चार केला.

आभासी चलन किंवा क्रिप्टोकरन्सी हे प्रत्येक्षात न दिसणारे चलन आहे, ज्याची जागतिक पातळीवर खरेदी- विक्री डिजिटल, इंटरनेट किंवा संगणकीय माध्यमातून होते आहे.

आभासी चलन किंवा क्रिप्टोकरन्सीवर कुठल्याही देशाचे, सरकारचे (Government) किंवा कुठल्याही देशाच्या मध्यवर्ती बँकेचे नियंत्रण नाही. ना कुठल्याही बँकेचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्येक्ष हस्तक्षेप त्यात सहभाग नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT