अर्थविश्व

सरकारी कर्मचाऱ्यांना LTC व्हाऊचर कॅश करण्याची शेवटची संधी, जाणून घ्या सर्वकाही

सकाळन्यूजनेटवर्क

केंद्र सरकारनं (Central Govt) एलटीसी (LTC) योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना प्रवासांमध्ये सूट मिळते. कोरोना महामारीमुळे (Covid-19) देशात लॉकडाउन लागला होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एलटीसी योजनेचा लाभ घेता आला नव्हता.  त्यामुळेच सरकारनं कर्मचाऱ्यांच्या एलटीसी आणि एलटीए व्हाऊचरला क्लेम करण्यासाठी सूट दिली होती.  एलटीसी कॅश व्हाउचर योजनेअंतर्गत कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी, GST रक्कम आणि विक्रेत्याचा GST क्रमांक असलेली योग्य बिले आपल्या एम्प्लॉयरला (एम्प्लॉयर योजना देत असेल तर) 31 मार्च, 2021 रोजी किंवा त्यापूर्वी सादर केली गेली असतील, याची खात्री करुन घ्या. योजनेनुसार कर्मचार्‍यांना 12 टक्के किंवा त्याहून अधिक जीएसटी असणार्‍या वस्तू आणि सेवांवर LTA फेअर म्हणून समजल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा तिप्पट खर्च करावा लागतो.

नवीन करपद्धतीचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना एलटीसी या योजनेचा लाभ घेत येणार नाही. केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार वर्षांतून एकदा आवडीच्या ठिकाणी जाण्यासाठी रजा व प्रवास खर्च अशी एलटीसी सवलत मिळते. याशिवाय, गावी जाण्याची सवलतही त्यांना दिली जाते. महामारीच्या काळात प्रवास करणे अशक्य असल्यामुळे सरकार कर्मचाऱ्यांना कॅश व्हाउचर देत आहे. कर्मचारी त्यावर ३१ मार्च २0२१ पूर्वी वस्तू खरेदी करू शकतील. ही खरेदी डिजिटल पद्धतीने व जीएसटी नोंदणी असलेल्या दुकानांतूनच करावी लागेल. १२ टक्के व त्यापेक्षा जास्त जीएसटी लागणाऱ्या बिगरखाद्य वस्तूंचीच खरेदी यावर करता येईल.

या योजनेअंतर्गत केंद्रीय कर्मचारी चार वर्षांत दोन वेळा एलटीसीसाठी क्लेम करु शकतो. सध्याचा याचा कालावधी २०१८ ते २०२१ असा आहे. म्हणजे या चार वर्षांत दोनवेळा तुम्ही एलटीसीसाठी क्लेम करु शकता. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT