Digital Currency sakal
अर्थविश्व

Digital Currency : पेटीएम आणि गुगल-पे पेक्षा डिजिटल रुपया का आहे वेगळा? जाणून घ्या

डिजिटल रुपयाची पेटीएम, गुगल-पे आणि फोन-पे सारख्या UPI अॅप्सशी स्पर्धा करणार का?

सकाळ डिजिटल टीम

भारत सरकारच्या डिजिटल रुपयाच्या घोषणेमुळे, सध्याच्या डिजिटल वॉलेट व्यवसायांवर त्याचा परिणाम होईल की नाही याबद्दल अंदाज बांधला जात आहे, डिजिटल रुपया अद्याप प्राथमिक अवस्थेतच्या टप्प्यात असताना त्याचा भारतातील बाजारावर परिणाम होईल अशी अपेक्षा आहे.

डिजिटल रुपयामुळे व्यवसायांना ऑनलाइन व्यवहार करणे सोपे होणार आहे. कारण डिजिटल रुपया ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असेल, ज्यामुळे जलद आणि सुरक्षित व्यवहार करता येतील. पण आता प्रत्येकाला असा प्रश्न पडत आहे की, पेमेंटची ही नवीन पद्धत युपीआय आणि पेटीएम आणि गुगल पे सारख्या मोबाईल वॉलेटशी थेट स्पर्धा करू शकते का?

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे...

डिजिटल रुपयाची मोबाईल वॉलेट आणि पेटीएम, गुगल-पे आणि फोन-पे सारख्या UPI अॅप्सशी स्पर्धा नाही. डिजिटल पेमेंटचा हा एक नवीन मार्ग आहे. या अंतर्गत, तुम्ही बँकेतून एकदा डिजिटल पैसे खरेदी करून इतर कोणत्याही व्यक्ती किंवा व्यापाऱ्याला देऊन वॉलेट टू वॉलेट व्यवहार करू शकता. डिजिटल रुपयाला आरबीआयचे समर्थन मिळेल, ज्यामुळे त्याची विश्वासार्हता आणखी वाढेल.

डिजिटल रुपया इतर व्यवहारांपेक्षा वेगळा कसा असेल?

सध्या आपण कोणत्याही व्यापाऱ्याला ई-वॉलेट किंवा UPI द्वारे जे पेमेंट करतो त्याला डिजिटल चलन म्हणता येणार नाही. कारण या माध्यमातून पैसा केवळ भौतिक चलनाच्या स्वरूपात काम करतो. म्हणजेच, तुम्ही पेमेंटसाठी वापरलेले चलन सध्याच्या भौतिक चलनाच्या समतुल्य आहे. पुढे, हे शक्य आहे की. मोबाइलद्वारे पेमेंट सुविधा प्रदान करणार्‍या कंपन्या त्यांच्या अॅपचा एक भाग डिजिटल रुपयाला देऊ शकतात.

सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) हे रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या चलनी नोटांचे डिजिटल स्वरूप असेल. आर्थिक वर्ष 2022-23 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात, अर्थमंत्र्यांनी ब्लॉकचेन आधारित डिजिटल रुपया सादर करण्याची घोषणा केली होती. मध्यवर्ती बँकेचे म्हणणे आहे की, चलनाचे स्वरूप बदलण्याऐवजी डिजिटल रुपया वापरणे योग्य होईल. त्याचा उद्देश ग्राहकांना पेमेंटसाठी अतिरिक्त पर्याय देणे हा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Election 2026 : तामिळनाडूत 'विजय युग' सुरू, सरकार स्थापनेचा केला दावा; राहूल गांधींची साथ मिळणार ?

Pargaon Crime : विवाहित मुलीचे दुसरे लग्न लाऊन देण्याच्या उद्देशाने वडीलांनीच केले अपहरण; वडीलांसह सात आरोपींना चार तासांत अटक

ऐन गर्दीच्या वेळी एसी लोकलच्या टपावर तरुणाचा थरारक प्रवास, वाहतूक कोलमडली, रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा; Video Viral

Latest Marathi News Live Update : मोबाईल चोरी अपयशी ठरल्याने महिलेवर हल्ला

Tailoring Business : रेडिमेडच्या जमान्यात शिवणकाम व्यवसायाला नवसंजीवनी! ‘परफेक्ट फिटिंग’साठी महिलांची पसंती

SCROLL FOR NEXT