share market. Sakal
अर्थविश्व

Share Market मध्ये Profit कमवायचा? 'या' दोन शेअर्सचा नक्की विचार करा

तुम्ही योग्य वेळी शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मजबूत परतावा मिळू शकतो.

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. त्याचबरोबर असे काही शेअर्स आहेत ज्यात गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना संयम तितकाच गरजेचा आहे.

तुम्ही योग्य वेळी शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मजबूत परतावा मिळू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही शेअर्सबद्दल सांगणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. शिवाय येत्या काळात हे शेअर्स चांगला परतावा देण्याची क्षमता बाळगून आहेत. (do you want profit in share market invest in these two shares)

आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफ (ICICI PRU LIFE)
शेअर बाजार तज्ज्ञांनी आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफच्या (ICICI PRU LIFE)  शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकमध्ये 500-510 रुपयांचे टारगेट तज्ज्ञांनी दिले आहे. या शेअरमध्ये मंगळवारी एचएनआयची खरेदी दिसून आली.

ओपन इंटरेस्टमध्ये 8% वाढ झाल्याचे दिसून येत आहे. येत्या काळात हा शेअर रेकॉर्डब्रेक किंमतीवर जाईल असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

जेएसपील (JSPL)
शेअर बाजार तज्ज्ञांनी दुसऱ्या शेअरसाठी जेएसपीलची (JSPL) निवड केली आहे. या शेअरबात त्यांवी बीटीएसटी तत्वावर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजे जर तुम्ही आज हे शेअर्स खरेदी करत असाल तर उद्या हे शेअर्स विकून टाका असा याचा अर्थ होतो. या स्टॉकमध्ये शॉर्ट-कव्हरिंग दिसू शकते असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Megablock: तीन दिवस विशेष ब्लॉक! लाेकल, मेल-एक्स्प्रेसवर परिणाम, वेळापत्रकात बदल; पाहा कधी आणि कोणत्या मार्गावर?

'अरे ही तर म्हातारी...' शाहरुखच्या होणाऱ्या सूनेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, आर्यनची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?, व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Updates : कोल्हापूरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला विरोध मोर्चा

उमेदवारी नको पण हकालपट्टी टाळा, मुंबईला तिकिट मागायला गेलेल्या ४ भाजप पदाधिकाऱ्यांची फजिती; बारमध्ये काय घडलं?

ED Raids: आंध्रातील मद्य गैरव्यवहारप्रकरणी छापे; तेलंगण, तमिळनाडू, कर्नाटक, दिल्लीमध्ये २० ठिकाणी कारवाई

SCROLL FOR NEXT