Share Market  Sakal
अर्थविश्व

Share Market : गुंतवणुकीची सुवर्ण संधी! डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीला 1247 कोटीचा नफा; शेअर्समध्ये होणार...

फार्मा क्षेत्रातील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Share Market : फार्मा क्षेत्रातील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने (Dr. Reddy's Laboratories) बुधवारी आर्थिक वर्ष 2023 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा अपेक्षेपेक्षा जास्त राहिला.

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजचाFY23 च्या तिसर्‍या तिमाहीत एकत्रित नफा 835.5 कोटीच्या अंदाजापेक्षा वाढून 1,247 कोटी झाला आहे. याच कालावधीत कंपनीच्या एकत्रित उत्पन्नातही वाढ झाली आहे.

FY23 च्या तिसऱ्या तिमाहीत डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने एकत्रित उत्पन्न (Consolitated Income) वाढून 6,770 कोटी रुपये झाले.

वार्षिक आधारावर, डॉ. रेड्डीजचा एकत्रित नफा आर्थिक वर्ष 2023 मध्ये 1,247 कोटी रुपयांपर्यंत वाढला, तर आर्थिक वर्ष 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित नफा 706 कोटी रुपये होता.

FY2023 मध्ये, डॉ. रेड्डीजचे एकत्रित उत्पन्न वार्षिक आधारावर 6,770 कोटी रुपयांपर्यंत वाढले, तर FY22 च्या तिसऱ्या तिमाहीत, कंपनीचे एकत्रित उत्पन्न 5,319.7 कोटी रुपये होते.

वार्षिक आधारावर, डॉ. रेड्डीजचा एबिटदा FY2023 मध्ये वाढून 1,966 कोटी रुपये झाला आहे जो FY2022 मध्ये 1,266 कोटी रुपये. डॉ. रेड्डीजचा एबिटदा मार्जिन FY2023 मध्ये 29% पर्यंत वाढले आहे तर कंपनीचा एबिटदा 2023 मध्ये 2% होता.

हेही वाचा : ...इथं बनतो आपला लाडका तिरंगा

25 जानेवारी 2023 रोजी, बाजार बंद होताना, हा स्टॉक एनएसईवर 1.22 टक्क्यांनी अर्थात 51.80 अंकांनी खाली 4200.95 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 4645 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 3654 रुपये आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Schools Closed India : देशात ५ वर्षांत १७ हजार सरकारी शाळा बंद, अहवालातून धक्कादायक माहिती उघड; शिक्षण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह

'श्री' पुन्हा परतला! शंशाक केतकरचं झी मराठीवर कमबॅक, 'या' मालिकेत एन्ट्री घेणार

Pimpri Chinchwad Metro: निगडी-चाकण मेट्रो मार्ग ‘डीपीआर’च्या टप्प्यात; सुमारे १३ हजार कोटींचा आराखडा, शहरात ‘रिंग मेट्रो नेटवर्क’चीही चर्चा

Latest Live Updates Marathi : जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस रस्त्यावरून घसरली; अनेक जण जखमी

PoK Election Violence : पीओके विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात हिंसाचार; गोळीबाराचा थरारक व्हिडिओसमोर, ५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

SCROLL FOR NEXT