Share Market Latest Updates | Stock Market News Sakal
अर्थविश्व

एका वर्षात 307% परतावा देणाऱ्या या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये पुन्हा येणार तेजी

ड्यूकॉन इन्फ्राटेकचे (Ducon Infratechnologies) शेअर्स सोमवारी 6% पेक्षा जास्त वाढले.

शिल्पा गुजर

ड्यूकॉन इन्फ्राटेकचे (Ducon Infratechnologies) शेअर्स सोमवारी 6% पेक्षा जास्त वाढले. (ड्युकॉन इन्फ्रा टेक्नॉलॉजीजचे Ducon Infratechnologies) शेअर्स बीएसईवर 28 रुपयांवर व्यवहार करत होते. अशातच कंपनीच्या संचालक मंडळाने बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. बोनस जारी करण्याची तारीख 19 एप्रिल अर्थात आज आहे. कंपनीने 1:10 च्या प्रमाणात इक्विटी शेअर्स शेअर करण्याची घोषणा केली आहे. (Ducon Infratechnologies announced to give bonus shares)

25 फेब्रुवारी 2022 रोजी ड्यूकॉन इन्फ्राटेक्नॉलॉजीजची बोर्ड बैठक झाली होती. या बैठकीत 1:10 या प्रमाणात शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शेअर्सना अतिरिक्त शेअर्सचे पूर्ण पैसे दिले जातील जे कंपनी तिच्या विद्यमान भागधारकांना जारी करेल. बोर्डाने प्रत्येक 10 इक्विटी शेअर्ससाठी 1 शेअर जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच ऑथराइज्ड शेअर कॅपिटल वाढवण्याचा निर्णयही कंपनीने घेतला आहे.

ड्यूकॉन इन्फ्रा टेक्नॉलॉजीजचे मल्टीबॅगर शेअर्स या वर्षी आतापर्यंत 307% वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 6 महिन्यांत 117% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. या वर्षातील आत्तापर्यंतच्या परताव्यावर नजर टाकली तर कंपनीच्या शेअर्समध्ये 27% वाढ झाली आहे. पण दुसरीकडे, याच काळात हा शेअर बीएसईवर 4% पेक्षा जास्त घसरला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pachod News : पोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे विरजण..! बैलांना आंघोळ घालायलाही नाही पाणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चार युवक पाण्याच्या टाकीवर; सरकारच्या भूमिकेविरोधात संताप

Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पत्नीने संपविले जीवन

त्यांच्या मिसेस आमच्यासाठी चहा घेऊन आल्या... सचिन तेंडुलकरांच्या पाहुणचाराने भारावलेला निलेश साबळे; म्हणाला- जेव्हा ते आले...

SCROLL FOR NEXT