EPFO
EPFO  esakal
अर्थविश्व

EPFO ची रक्कम खात्यात जमा, कशी चेक करायची जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) २०२०-२१ आर्थिक वर्षासाठी २३ कोटींपेक्षा जास्त ग्राहकांच्या खात्यात ८.५० टक्के दराने व्याज (PF Interest) जमा केले आहे. इपीएफओने अधिकृत ट्विटर हँडलवरून सांगितले की, आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये आतापर्यंत २३.४४ कोटी लोकांच्या खात्यात ८.५० टक्के दराने पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. तुमच्या पीएफ खात्यात पैसे आले की नाही हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही या पद्धतींनी पीएफ खात्यातील शिल्लक तत्काळ तपासू शकता.

sms

एसएमएसद्वारे (SMS) बॅलन्स तपासू शकता

इपीएफओकडे असलेल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर EPFO ​​UAN LAN (भाषा) पाठवा. LAN चा अर्थ तुमची भाषा असा आहे. तुम्हाला इंग्रजीत माहिती हवी असल्यास तर LAN ऐवजी ENG लिहावे लागेल. अशाचप्रकारे, हिंदीसाठी HIN आणि तमिळसाठी TAM लिहायचे आहे. हिंदीमध्ये माहिती मिळविण्यासाठी तुम्हाला EPFOHO UAN HIN लिहून मॅसेज करावा लागेल.

Miss-Call

मिस कॉल देऊन तपासा

तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिस कॉल देऊनही इपीएफ (EPF) बॅलन्स किती आहे ते तपासू शकता. यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 011-22901406 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल.

epfo

EPFO ची वेबसाइट बघा

तुमचा बॅलन्स ऑनलाइन बघण्यासाठी इपीएफ (EPF) पासबुक पोर्टलवर जा. या पोर्टलवर तुमचा युएन (UAN) क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. त्यानंतर Download/View Passbook वर क्लिक करून तुमचे पासबुक उघडेल. त्यानंतर तुम्ही बॅलन्स चेक करू शकता.

Mobile App

UMANG अॅप वरून तपासा

जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर अॅपचा वापर करून तुम्ही पाहिजे तेव्हा ईपीएफ बॅलन्स बघू शकता. यासाठी उमंग एप उघडून EPFO वर क्लीक करा. त्यात Employee Centric Services वर क्लीक करा. त्यानंतर View Passbook वर क्लीक करून युएएन नंबर आणि पासवर्ड टाता. रजिस्टर मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. तो नंबर टाकून तुम्ही ईपीएफ चेक करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

Aditya Thackeray: लोकसभेनंतर शरद पवार भाजपसोबत जातील का? विश्वासार्हतेबद्दल आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT