money 
अर्थविश्व

यामुळे तुमच्या पगारात होणार वाढ; पाहा कशी?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष हातात मिळणाऱ्या पगारात (टेक होम सॅलरी) वाढ व्हावी म्हणून सरकार प्रयत्नशील असल्याचे समजते. यासाठी कर्मचाऱ्यांच्या सॅलरीतून कापल्या जाणाऱ्या प्रॉव्हिडंट फंडाची (पीएफ) रक्कम कमी करण्यावर सरकार विचार करीत असल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.

सद्यस्थितीत 'सामाजिक सुरक्षा कोड विधेयक 2019' नुसार, कर्मचाऱ्याच्या बेसिक पगारातून 12 टक्के रक्कम पीएफ राखीव निधीसाठी कापली जाते. तर तेवढीच रक्कम कर्मचारी काम करत असलेल्या संस्थेकडून जमा करण्यात येते. मात्र कर्मचाऱ्यांच्या हातात जास्त पैसे यावेत व पर्यायाने त्यांची खरेदी क्षमता (कंझम्पशन) वाढावी यासाठी सरकार हा पर्याय अवलंबणार असल्याचे समजते.

'सामाजिक सुरक्षा कोड विधेयक 2019' केंद्रीय मंत्री मंडळाने संमंत केले असून या आठवड्यात ते संसदेत मंजुरीसाठी मांडले जाणार आहे. त्यावेळी हा बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे समजते. सर्वात महत्वाचे म्हणजे कर्मचाऱ्याच्या पीएफ कपात रकमेत घट झाली तरी त्याच्या कंपनीकडून जमा होणारी रक्कम मात्र पाहिल्याप्रमाणेच राहणार आहे.

याशिवाय, या विधेयकानुसार फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्टवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रो रेटा बेसिस वर ग्रॅच्युइटीचा फायदा मिळणार आहे. सध्या, पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ऍक्ट 1972 नुसार,  ज्या कर्मचाऱ्यांनी एकाच संस्थेत पाच वर्षे पूर्ण केली आहेत, तेच ग्रेच्युटीसाठी पात्र आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT