Bond
Bond sakal
अर्थविश्व

भारत बाँड ईटीएफ

अतुल सुळे

वर्ष २०१९ पासून सुरू झालेल्या ‘भारत बॉँड ईटीएफ’ची चौथी मालिका दोन डिसेंबरपासून बाजारात दाखल झाली असून, तिची न्यू फंड ऑफर आठ डिसेंबर २०२२ पर्यंत खुली राहणार आहे. या मालिकेची मुदतपूर्ती एप्रिल २०३३ मध्ये होणार असून, या योजनेद्वारे केंद्र सरकारने रुपये एक हजार कोटी रुपयांचे भांडवल उभे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे;

तसेच जास्ती रक्कम जमा झाल्यास त्यापैकी चार हजार कोटी सरकार आपल्याकडे ठेवून घेऊ शकते. या मालिकेतील पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारने रुपये १२,४०० कोटी उभे केले होते. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात अनुक्रमे रुपये ११,००० कोटी व रुपये ६,२०० कोटी गोळा केले होते. या फंडाची निर्मिती व व्यवस्थापन एडलविज एएमसी करणार आहे.

या योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये

छोटे गुंतवणूकदार या ‘एनएफओ’मध्ये कमीत कमी एक हजार रुपये व त्यापुढे एक रुपयाच्या पटीत गुंतवणूक करू शकतात.

संस्थागत गुंतवणूकदार कमीत कमी रुपये २,००,००१ व त्यापुढे एक रुपयाच्या पटीत गुंतवणूक करू शकतात.

‘ईटीएफ’मध्ये गुंतवणूक करण्यासाठी डी-मॅट खाते असावे लागते. डी-मॅट खाते नसल्यास या योजनेच्या ‘फंड ऑफ फंड’मध्ये गुंतवणूक करता येते.

ही योजना केवळ ‘ट्रिपल ए’ रेटिंग असलेल्या सरकारी कंपन्यांच्या कर्जरोख्यात गुंतवणूक करणार आहे.

या योजनेतील गुंतवणुकीला लॉक-इन नसतो व मुदतीआधी युनिट्स राष्ट्रीय शेअर बाजारात म्हणजे ‘एनएसई’वरती विकता येतील. ही योजना ‘निफ्टी भारत बॉंड इंडेक्स एप्रिल २०३३’ या निर्देशांकाला ट्रॅक करणार आहे.या निर्देशांकाचा अपेक्षित परतावा ७.५ टक्के आहे, जो मुदतपूर्तीच्या वेळी मुद्दलाबरोबर मिळेल. गेल्या वर्षभरात ‘भारत बॉंड ईटीएफ’ने सुमारे दोन ते चार टक्के परतावा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वेगाने वाढविल्याने परतावा कमी मिळाला आहे, असे फंड मॅनेजरचे म्हणणे आहे.

(लेखक आर्थिक घडामोडींचे अभ्यासक-विश्‍लेषक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day : 1 मे ला कामगार दिवस का म्हटले जाते? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत, पण शेतकऱ्यांची संमती पुनर्गठन आवश्यक

Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT