Share
Share Sakal
अर्थविश्व

बाजार मंदीत असताना या शेअर्सची करा खरेदी; तज्ज्ञांचा सल्ला

सकाऴ वृत्तसेवा

ऑटो, फार्मा, एफएमसीजी आणि आयटी शेअर्समध्येही दबाव दिसला.

- शिल्पा गुजर

शेअर बाजारात सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नफा बुकिंग सुरू आहे. ज्यामुळे मिडकॅप्सला सर्वाधिक फटका बसला. मिडकॅप निर्देशांक 2 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. मिडकॅप 692 अंकांनी घसरून 31,478 वर बंद झाला. पीएसई, रियालिटी, मेटल शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली. ऑटो, फार्मा, एफएमसीजी आणि आयटी शेअर्समध्येही दबाव दिसला. अगदी काही प्रमाणात सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि माध्यम शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. सेन्सेक्स 456 अंकांनी तर निफ्टी 152 अंकांनी घसरला.

निफ्टीचे 50 पैकी 39 स्टॉक घसरले. त्याचवेळी सेन्सेक्सच्या 30 पैकी 22 शेअर्सची विक्री झाली. निफ्टी बँकेचे 12 पैकी 6 शेअर्स वाढले. सेन्सेक्स 456 अंकांनी घसरून 61,260 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 152 अंकांनी कमी होऊन 18,267 वर बंद झाला. निफ्टी बँक 22 अंकांनी कमी होऊन 39,518 वर बंद झाली. मिडकॅप 692 अंकांनी घसरून 31,478 वर बंद झाला.

अर्थव्यवस्था पुन्हा सुरू होणे, कमी व्याजदर आणि भौतिक क्षेत्रासह खासगी क्षेत्राचा वाढता खर्च यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा होईल असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. सध्याच्या काळात शेअर्स खरेदी करण्याची चांगली संधी असल्याचेही ते म्हणाले.

आज कशी असेल शेअर बाजारातील स्थिती ?

बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी बाजारात विक्रीचा दबाव होता असे हेम सिक्युरिटीजच्या मोहित निगम यांनी सांगितले. ही सुधारणा बाजारासाठी चांगली आहे. शेअर बाजार घसरणीवर असताना क्वालिटी शेअर्स खरेदी करावे असेही निगम म्हणाले. दूसरीकडे निफ्टीसाठी 18,100 वर सपोर्ट दिसून येतो आहे.

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

- हिंडाल्को इंडस्ट्रीज (HINDALCO)

- भारत पेट्रोलियम (BPCL)

- टायटन (TITAN)

- बजाज फिनसर्व लिमिटेड (BAJAJFINSV)

- हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)

- आयआरसीटीसी (IRCTC)

- आरती इंडस्ट्रीज (AARTIIND)

- वोल्टास (VOLTAS)

- पेज इंडसट्रीज लिमिटेड (PAGEIND)

- एसआरएफ लिमिटेड (SRF)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT