Stock Market Recommendation Sakal
अर्थविश्व

'या' शेअरचा एका वर्षात 200 टक्के परतावा, आता खरेदी करणं फायद्याचं ठरेल का?

यावर्षी मल्टीबॅगर स्टॉकची यादी मोठी आहे आणि या यादीत Faze 3 Ltd चे नाव देखील जोडले गेले आहे.

शिल्पा गुजर

Best Stock to Buy: यावर्षी मल्टीबॅगर स्टॉकची यादी मोठी आहे आणि या यादीत Faze 3 Ltd चे नाव देखील जोडले गेले आहे. कंपनीचे मार्केट कॅप 834.02 कोटी रुपये आहे. ही कंपनी भारतातील सुप्रसिद्ध होम टेक्सटाईल आणि ऑटोमोटिव्ह फॅब्रिक कंपनी आहे. 24 मे 2021 रोजी कंपनीचे शेअर्स 100 रुपयांच्या आत म्हणजेच 96.55 रुपयांवर होते. जे आता 342.95 रुपये झाले आहे. म्हणजेच, Faze 3 Ltd च्या शेअर्सनी केवळ एका वर्षात 255.20% परतावा दिला. त्याच्या शेअर्सनी यावर्षी आतापर्यंत 18.54% परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 17.07% वाढ झाली आहे. Faze 3 Ltd चे शेअर्स सध्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या डे मूव्हिंग एव्हरेजवर (DMA) व्यापार करत आहेत.

कंपनीचे निकाल?

मार्च 2022 च्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 44.53% ने वाढून रु. 157.06 कोटी झाले. एका वर्षापूर्वी ते 108.67 कोटी रुपये होते. मार्च तिमाहीत कंपनीचा EBIT 56.24% ने वाढून 21.64 कोटी रुपये झाला. त्याच वेळी, कंपनीचा करानंतरचा नफा अर्थात प्रॉफीट आफ्टर टॅक्स (PAT) वार्षिक आधारावर 85.22% ने वाढून 15.92 कोटी झाला आहे. वर्षभरापूर्वी तो 8.59 कोटी रुपये होते.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

Faze 3 Ltd ची आर्थिक स्थिती गेल्या 5 वर्षांत सातत्याने मजबूत झाल्याचे ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने सांगितले. त्याचा परिणाम कंपनीच्या शेअरवरही स्पष्टपणे दिसून येत आहे. कापूस आणि पॉलिस्टर धाग्याच्या वाढत्या किमतींमुळे कंपनीला येत्या काळात आव्हानांना सामोरे जावे लागत आहे, पण लॉन्ग टर्मचा विचार केल्यास आणखी तेजी येईल याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ICICI सिक्युरिटीजने Faze 3 Ltd चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, टारगेट 405 रुपये निश्चित केले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT