atm sakal media
अर्थविश्व

ATM मध्ये पैसे नसल्याचा त्रास होणार दूर; आता बँकांना होणार दंड

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : बरेचदा तुम्ही एटीएममध्ये पैसे काढायला जाता मात्र, त्या एटीएममध्ये पैसेच नसल्यामुळे तुमचा हिरमोड होतो. अशी घटना तुमच्याबरोबर वारंवार झाली असेल. मात्र, आता ग्राहकांना कॅश-आऊट्स एटीएमपासून मुक्ती मिळणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात एक महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. या आदेशामुळे एटीएमसंदर्भातला तुमचा त्रास आता कमी होणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सर्व बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सना आता एटीएममध्ये वेळोवेळी वेळेवर पैसे भरण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून एटीएममध्ये पैसे नसल्याने ग्राहकाचा हिरमोड आणि गैरसोय होणार नाही. जर असं घडलं तर त्या बँकेला दंडाला सामोरे जावं लागणार आहे..

एटीएममध्ये रोख पैशांच्या उपलब्धतेबाबत लक्ष ठेवण्यासाठी सर्व बँकांच्या अध्यक्षांना, व्यवस्थापकीय संचालकांना आणि सीईओंना त्यांची याबाबतची यंत्रणा मजबूत करण्याबाबत सुचना दिल्या गेल्या आहेत. आरबीआयने याबाबतच्या एका पत्रात म्हटलंय की, रोख रक्कम उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होते.

त्यामुळे, असा निर्णय घेण्यात आला आहे की बँका/ व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर (डब्ल्यूएलएओ) एटीएममध्ये रोख रक्कमेच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवतील आणि कॅश-आऊट्स टाळण्यासाठी वेळोवेळी वेळेवर भरपाई करण्यासाठीच्या त्यांच्या यंत्रणा अधिक मजबूत करतील.' असं प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक यांनी या आदेशात म्हटलंय.

या पत्रात पुढे म्हटलंय की, या संदर्भातील आदेश न पाळण्याकडे गांभीर्याने पाहिले जाईल आणि 'Scheme of Penalty for non-replenishment of ATMs' मध्ये नमूद केल्याप्रमाणे आर्थिक दंड आकारला जाईल.'

ही योजना 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होईल. या योजनेअंतर्गत कोणत्याही एटीएममध्ये महिन्यामध्ये 10 तासांपेक्षा जास्त काळ रोख रक्कम उपलब्ध नसल्यास बँकांना ₹ 10,000 दंड आकारला जाईल. व्हाईट लेबल एटीएम (डब्ल्यूएलए) मध्ये अशाच प्रकारच्या रोख रकमेसाठी, विशिष्ट डब्ल्यूएलएची रोख आवश्यकता पूर्ण करणाऱ्या बँकांना दंड आकारला जाईल. मात्र, बँक आपल्या विवेकबुद्धीनुसार, डब्ल्यूएलए ऑपरेटरकडून दंड वसूल करू शकते, असं आरबीआयने म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT