PhonePe Flipkart  sakal
अर्थविश्व

PhonePe कंपनीचा Flipkart पासून घटस्फोट, जाणून घ्या कारण...

लॉन्च झाल्यापासून, PhonePe ने 35 दशलक्ष ऑफलाइन व्यापाऱ्यांचे डिजिटायझेशन केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

फ्लिपकार्ट आणि फोन पे (PhonePe) या दोन्ही कंपन्यांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या दोन्ही कंपन्या वेगळ्या झाल्या आहेत पण दोन्ही कंपन्या वॉलमार्ट या अमेरिकन कंपनीच्या अंतर्गत काम करत राहणार आहेत.

2016 मध्ये PhonePe फ्लिपकार्ट ग्रुपने विकत घेतले होते. अर्थातच फ्लिपकार्ट आणि फोनपे एकमेकांपासून वेगळे झाले आहेत परंतु वॉलमार्ट कंपनी या दोन्ही कंपन्यांचे बहुसंख्य भागधारक राहतील.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

वॉलमार्ट दोन्ही व्यवसाय गटांचे बहुसंख्य भागधारक राहील. PhonePe चे संस्थापक आणि CEO समीर निगम म्हणाले, "फ्लिपकार्ट आणि PhonePe आता प्रत्येकी 400 दशलक्ष वापरकर्ते असलेले भारतीय ब्रँड आहेत."

ते म्हणाले की, आम्ही आमच्या वाढीचा पुढील टप्पा पाहत आहोत. आम्ही आमच्या नवीन व्यवसाय क्षेत्रात जसे की विमा, मालमत्ता व्यवस्थापन आणि कर्ज व्यवसायात गुंतवणूक करत आहोत. यासह, आम्ही देशातील UPI पेमेंट वाढीचा एक भाग बनत आहोत. यासह, अब्जावधी भारतीयांच्या आर्थिक समावेशाचे आमचे स्वप्न पूर्ण करू शकू.

लॉन्च झाल्यापासून, PhonePe ने 35 दशलक्ष ऑफलाइन व्यापाऱ्यांचे डिजिटायझेशन केले आहे. समीर निगम, PhonePe चे संस्थापक आणि CEO म्हणाले, “आम्ही आमच्या वाढीच्या पुढील टप्प्याची वाट पाहत आहोत कारण, आम्ही नवीन व्यवसायांमध्ये गुंतवणूक करणार आहोत. ज्यामध्ये विमा, संपत्ती व्यवस्थापन आणि कर्ज देणे.''

Flipkart ने सांगितले की, हा निर्णय भारताबाहेर PhonePe च्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी घेण्यात आला आहे. PhonePe आणि Flipkart या दोन्हींचे भारतात 250 दशलक्ष वापरकर्ते आहेत. स्वतंत्र कंपनी झाल्यानंतर, कंपनी आता निधी उभारण्यासाठी स्वतःचा स्वतंत्र IPO आणू शकणार आहे. Phone Pe 2023 मध्ये त्याचा IPO आणू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT