Narendra Modi  Sakal
अर्थविश्व

Free TV : मोफत रेशननंतर आता तुमचा टीव्ही पाहण्याचाही खर्च उचलणार केंद्र सरकार!

केंद्र सरकारने आता सर्वसामान्यांना डिश टीव्ही मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Free Dish Tv : केंद्रातील मोदी सरकार सर्वसामान्यांना अनेक सुविधा पुरवते. मोफत अन्नधान्यापासून घरापर्यंत अनेक गोष्टी मोदी सरकार जनतेला देत आहे.

यासोबतच आता सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आता सर्वसामान्यांना डिश टीव्ही मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीची स्थिती सुधारण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओची स्थिती सुधारण्यासाठी 2,539 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे.

देशातील दुर्गम, सीमावर्ती आणि आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांना मोफत डिशची सुविधा दिली जाईल, असे सरकारने सांगितले आहे. या भागातील सुमारे 7 लाख लोकांच्या घरी मोफत डिश बसवण्यात येणार आहे.

या योजनेद्वारे डीटीएचचा विस्तार करण्याची केंद्राची योजना आहे. यासोबतच जुनी स्टुडिओ उपकरणे आणि ओबी व्हॅन पूर्णपणे बदलण्याची योजना आहे.

हेही वाचा : ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

सध्या दूरदर्शनच्या अंतर्गत जवळपास 36 टीव्ही चॅनेल आहेत. त्याच वेळी, यापैकी 28 प्रादेशिक वाहिन्या आहेत आणि आकाशवाणीकडे सध्या सुमारे 500 प्रसारण केंद्रे आहेत.

सरकारने एक प्रसिद्धी पत्रक जारी करून म्हटले आहे की, यामुळे देशातील रोजगारालाही चालना मिळेल. देशभरात टीव्ही, रेडिओसह अनेक क्षेत्रात रोजगार निर्माण होणार असून, त्यामुळे तरुणांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी आहे.

दूरदर्शनमध्ये मोठ्या बदलांसह, सरकार व्हिडिओ गुणवत्ता देखील सुधारेल. यासोबतच जुने ट्रान्समीटरही बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन एफएम ट्रान्समीटर बसवणार असल्याची माहिती सरकारने दिली असून जुने ट्रान्समीटर अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT