share market  google
अर्थविश्व

Stock: 34 वरुन थेट 586 रुपयांवर, या शेअरने दिला 1,600% रिटर्न...

पॉन्डी ऑक्सिडेस आणि केमिकल्सच्या शेअर्सने एप्रिल 2004 मध्ये बीएसईवर ट्रेडिंग करायला सुरुवात केली.

सकाळ डिजिटल टीम

पॉंडी ऑक्साइड्स अँड केमिकल्स लिमिटेडच्या (Pondy Oxides and Chemicals Ltd) शेअरने गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. अलीकडे, हे शेअर्स त्यांच्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स जारी करण्यासाठी चर्चेत होते. पॉन्डी ऑक्साइड आणि केमिकल्सचे शेअर्स शुक्रवारी बीएसईवर 5.11 टक्क्यांनी घसरून 586.05 रुपयांवर बंद झाले. 2022 च्या सुरुवातीपासून स्टॉकमध्ये सुमारे 156% वाढ झाली आहे. तर गेल्या एका वर्षात त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 161.63 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या 3 वर्षांत 560 टक्क्यांचा बंपर नफा दिला आहे.

पॉन्डी ऑक्सिडेस आणि केमिकल्सच्या शेअर्सने एप्रिल 2004 मध्ये बीएसईवर ट्रेडिंग करायला सुरुवात केली. त्यावेळी त्याच्या शेअर्सची किंमत 34.36 रुपये होती, जी आता 586.05 रुपये झाली आहे. म्हणजेच गेल्या 18 वर्षांत त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 17 पट (1,600 टक्के) पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने एप्रिल 2004 मध्ये त्याच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज तिचे  17 लाख झाले असते. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने फक्त 3 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 6.60 लाख रुपये झाले असते.ए खाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी ऑक्सिडेसच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे 2.61 लाख रुपये झाले असते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

Pune News : महापालिकेच्या सर्वपक्षीय कार्यालयांच्या सुशोभिकरणासाठी लाखोची उधळपट्टी

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Shirur Accident : पुणे-नगर रस्त्यावर एसटी बसच्या धडकेत दूचाकीस्वार तरूणाचा मृत्यु

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

SCROLL FOR NEXT