SIP Sakal
अर्थविश्व

आता सुटीच्या दिवशीही होणार ‘एसआयपी’चे डेबिट!

अतुल सुळे

जून महिन्यातील द्विमासिक पतधोरण समितीच्या बैठकीच्या वेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केले, की येत्या एक ऑगस्ट २०२१ पासून ‘नॅशनल ऑटोमॅटिक क्लिअरिंग हाउस’ (एनएसीएच) २४ x ७ x ३६५ तत्त्वावर काम करेल. या आधी रिझर्व्ह बँकेने डिसेंबर २०१९ मध्ये ‘एनइएफटी’, तर डिसेंबर २०२० मध्ये ‘आरटीजीएस’ २४ x ७ x ३६५ केले होते. त्यामुळेच एक ऑगस्टपासून आता ‘एनएसीएच’सुद्धा २४ x ७ x ३६५ कार्यरत ठेवणे शक्य होणार आहे. (From August 1 bank holidays won’t stop your SIP debits)

याचा सोप्या भाषेत अर्थ असा, की एक ऑगस्टपासून तुमची म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’, कर्जांचा ‘इएमआय’, विजेचे, दूरध्वनीचे, गॅसचे बिल हे बँकेला सुटी असली तरीसुद्धा तुमच्या खात्यातून ‘ऑटो डेबिट’ होऊ शकते. सध्या ‘ऑटो डेबिट’ तारखेला सुटी असल्यास ते दुसऱ्या दिवशी ‘डेबिट’ होते. त्यामुळे आता खातेधारकांना खात्यात पुरेशी शिल्लक ठेवणे गरजेचे होणार आहे, अन्यथा बँका, वित्तीय संस्था रु. २५० ते ३०० पर्यंत दंड आकारू शकतात.

त्याचप्रमाणे, आता एक ऑगस्टपासून तुमचा पगार, निवृत्तfवेतन, लाभांश, व्याज, सरकारी अनुदान हे बँकेच्या सुटीच्या दिवशीसुद्धा जमा होऊ शकते. ‘डिजिटल’ व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेने घेतलेला हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. त्यामुळे त्याचे स्वागत करायला हवे.

(लेखक बँकिंग व गुंतवणूक क्षेत्रातील जाणकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT