Share-Market sakal
अर्थविश्व

शेअर बाजाराचा युटर्न; सेन्सेक्स 1223 तर निफ्टी 331.90 अंकांनी वधारला

आज सकाळपासून शेअर बाजारात दोन्ही निर्देशांकांनी वरच्या दिशेने आगेकूच केली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: रशिया-युक्रेनयुद्धामुळे शेअर बाजारात सातत्याने होणारी घसरण आज थांबली. 28 मार्चनंतर आज पहिल्यांदाच शेअर बाजाराने सातत्यपूर्ण कामगिरी सकारात्मक कामगिरी केल्याचं पहायला मिळालं. आज सकाळपासून शेअर बाजारात दोन्ही निर्देशांकांनी वरच्या दिशेने आगेकूच केली. आज सकाळी सेन्सेक्स (Sensex) आज 369.9 अंकाच्या वाढीसह 53793.99 सुरु झाला होता तर निफ्टी (Nifty) आज 64.55 अंकाच्या वाढीसह 16078वर सुरु झाला होता. दिवसअखेर चढता आलेख कायम राहिला. दिवसअखेर तब्बल 1223.24 म्हणजेच 2.29 टक्क्यांनी वधारुन 54647.33 वर बंद झाला. तर निफ्टीमध्येही 2.07 टक्क्याची वाढ झाली. 331.90 अंकांच्या वाढीसह निफ्टी 16345.35 वर बंद झाला.

आज 38 स्टॉक्समध्ये सकारात्मक राहिले तर 12 स्टॉक्समध्ये घट झाली. एशियनपेंट, रिलायन्स, बजाज फायनान्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा हे शेअर टॉपला राहिले. तर श्री सिमेंट, ओएनजीसी, पावरग्रिड, एनटीपीसी यांसह 12 स्टॉक्समध्ये घसरण झाली.

कालचा दिवसही शेअर बाजारासाठी वरदान ठरला, कारण गेल्या सलग 4 दिवसांची घसरण थांबलेली दिसून आली आणि सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या चिन्हात बंद झाले. फार्मा आणि आयटी शेअर्सचा मोठा सपोर्ट मिळाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 581.34 अंकांच्या म्हणजेच 1.10 टक्क्यांच्या वाढीसह 53,424.09 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 150.30 अंकांच्या म्हणजेच 0.95 टक्क्यांच्या वाढीसह 16,013.45 वर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Politics: थलापती विजय यांना मोठा धक्का! फ्लोअर टेस्टमध्ये साथ देणाऱ्या आमदारांनी पलटी मारली; तमिळनाडूच्या राजकारणात यू-टर्न

IPL 2026 Qualifier 1 : गुजरात टायटन्सची पराभवामुळ डोकेदुखी वाढली! शुभमन गिल अन् संघाची झोप उडवणारी बातमी...

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! तामिळनाडू सरकारने जाहीर केली पीक कर्जमाफी; 14 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना थेट फायदा, 'थलपती'नं दिलेलं आश्वासन पाळलं

Bike Mileage Increasing Tips : टू व्हीलर गाडीचं मायलेज कमी आहे? मग आजच करा 'हे' 5 बदल, मायलेज होईल डबल

Latest Marathi News Live Update : ईदनिमित्त बळी देण्याची परवानगी रद्द, वरिष्ठ पोलिसांची माहिती

SCROLL FOR NEXT