Godrej products sakal media
अर्थविश्व

गोदरेज अॅग्रोव्हेटचे उत्पन्न वाढले

कृष्ण जोशी

मुंबई : वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यान्न व खाद्यपदार्थांचे उत्पादन (food production) करणाऱ्या गोदरेज अॅग्रोव्हेट या कंपनीचे (Godrej agrovet company) या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील तसेच सहामाहीतील उत्पन्न वाढले (income increases) असून नफा स्थिर राहिला आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील त्यांचे उत्पन्न 2,159 कोटी रुपये झाले, ते मागीलवर्षीच्या याच तिमाहीतील उत्पन्नापेक्षा (1,722 कोटी रु.) 25 टक्के जास्त आहे. तर यावर्षीच्या एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत त्यांना 4,162 कोटी रुपये उत्पन्न मिळाले. ते मागील वर्षीच्या याच सहामाहीपेक्षा 26 टक्के जास्त (3,285 कोटी रु.) होते.

त्यांना मागीलवर्षीच्या या तिमाहीत 111 कोटी रुपयांचा करोत्तर निव्वळ नफा मिळाला होता, तर यावर्षीच्या तिमाहीत तो 112 कोटी रुपये एवढा झाला. मागील वर्षीच्या एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीच्या 212 कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याच्या तुलनेत त्यांना यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत 217 कोटी रुपये निव्वळ नफा मिळाला.

कोविडचा विळखा सैलावत असताना आता यावर्षीच्या दुसऱ्या सहामाहीत चांगल्या व्यवसायाची व चांगल्या नफ्याची अपेक्षा आहे, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बलराम यादव यांनी सांगितले. पशुखाद्य व्यवसाय या तिमाहीत 21 टक्के वाढला, किमती वाढल्याने खाद्यतेलाचा व्यवसायही यावर्षी दुप्पट झाला, बेभरवशी पावसामुळे कृषी संरक्षण उत्पदनांचा व्यवसाय 24 टक्के घटला, डेअरीचा व्यवसायही किंचित घटला पण पोल्ट्री व कुक्कुट खाद्याचा व्यवसाय चांगलाच वाढला, असेही यादव म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic News : प्रवासाला निघालात? थांबा! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण ट्राफिक, सातारा-पुणे मार्गावरील खंबाटकी घाटातील स्थिती काय?

Mumbai News: कबुतरांना दाणे खायला घालणे पडले महागात, मुंबईतील व्यावसायिकावर कोर्टाची मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगरमध्ये तुफान राडा, उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Akola Municipal Election : भाजपच्या जागावाटपावर राष्ट्रवादी अजित पवार गटात अस्वस्थता? अमोल मिटकरींचं भाजपला थेट आव्हान...

Maharashtra Cold : राज्यात थंडी कायम राहण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT