gold hallmarking gold hallmarking
अर्थविश्व

Gold hallmarking rules: परभणी सराफा बाजारपेठ ठप्प

सराफा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या एक दिवशी बंदचा परिणाम आर्थिक उलाढालीवर मोठ्या प्रमाणात दिसून आला

सकाळ वृत्तसेवा

सराफा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या एक दिवशी बंदचा परिणाम आर्थिक उलाढालीवर मोठ्या प्रमाणात दिसून आला

परभणी: देशात सोने खरेदी विक्री करतांना हॉलमार्कींग युनिक आयडी अर्थात 'एचयुआडी' द्वारे शुध्दता तपासणी पध्दतीमध्ये केलेल्या बदलांच्या निषेधार्थ सोमवारी (ता.२३) जिल्ह्यातील सर्व सराफा व्यापाऱ्यांनी एक दिवसाचा बंद पाळला. ही कार्यप्रणाली रद्द करावी असी सराफा व्यापाऱ्यांची मागणी आहे. दरम्यान, सराफा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या एक दिवशी बंदचा परिणाम आर्थिक उलाढालीवर मोठ्या प्रमाणात दिसून आला.

परभणी जिल्हा सराफ असोसिएशनच्यावतीने सोमवारी (ता.२३) या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. यात ब्युरो ऑफ इंडियन स्टॅन्डर्डने (बीआयएस) हॉलमार्किंग युनिक आयडी अर्थात (एचयुआडी) द्वारे शुध्दता तपासणी पध्दतीमध्ये केलेला बदल हा असंविधानिक व चुकीचा असल्याचे सराफा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. याच्या निषेधार्थ संपूर्ण भारतातील सराफ व सुवर्णकार व्यवसायिकांनी सोमवारी (ता. २३) एक दिवसाचा लाक्षणिक बंद ठेवून निषेध व्यक्त केला. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या पध्दतीमुळे ग्राहकांवर खर्चाचा अतिरिक्त भार पडणार आहे. व्यापाऱ्यांनाही पेपरवर्क वाढल्याने त्रास होणार आहे. याचा निषेध म्हणून यासाठी हा बंद ठेवण्यात आला होता.

जिल्ह्यातील शेकडो सराफा व्यापाऱ्यांनी त्यांची प्रतिष्ठाणे बंद ठेवली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची सराफा व्यापारी संघटनेच्यावतीने भेट घेऊन त्यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन अंबिलवादे, जिल्हा सचिव सुनिल दहिवाळ, रमेशराव दाभाडे, दीपकराव टाक, संतोषराव शहाणे, अमोल कुलथे, पंकज अंबिलवादे आदींची उपस्थिती होती. सराफा व्यापाऱ्यांच्या या बंद मुळे जिल्ह्यात कोट्यावधीची उलाढाल बंद पडली होती.

ब्युरो ऑफ इंडियन स्टॅन्डर्डने (बीआयएस) शुध्दतेच्या चार प्रमाणित शिक्क्यामध्ये बदल करीत हॉलमार्किंग युनिक आयडीद्वारे शुध्दता तपासणीची चुकीची व असंविधानिक पध्दत आणली. इतेच नव्हे तर ती आणत असतांना सुवर्णकारांच्या शिखर संस्थाला विश्वासात घेतले नाही. येणाऱ्या अडचणीवर चर्चा न करता बदल करण्यात आले आहेत. ही पध्दत चुकीची आहे. त्यामुळे ती रद्द झाली पाहिजे ही आमची मागणी आहे.
- सचिन अंबिलवादे, जिल्हाध्यक्ष, सराफा असोसिएशन, परभणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT