gold rate google
अर्थविश्व

Gold price : आज देशभरात सोन्याचे दर स्थिर

१०० ग्रॅम सोन्याचा दर ५ लाख ११ हजार ६०० रुपये आहे. कालच्या तुलनेत या किंमतींमध्ये वाढ किंवा घट झालेली नाही.

नमिता धुरी

मुंबई : आज देशपातळीवर सोन्याचे दर स्थिर आहेत. २४ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ५ हजार ११६ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ४० हजार ९२८ रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ५१ हजार १६० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याचा दर ५ लाख ११ हजार ६०० रुपये आहे. कालच्या तुलनेत या किंमतींमध्ये वाढ किंवा घट झालेली नाही.

२२ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ४ हजार ६९० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ३७ हजार ५२० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ४६ हजार ९०० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याचा दर ४ लाख ६९ हजार रुपये आहे. कालच्या तुलनेत या किंमती स्थिर आहेत.

काही महत्त्वाच्या शहरांतील सोन्याचे दर (१ ग्रॅम)

शहर २२ कॅरेट २४ कॅरेट

मुंबई ४ हजार ६९० ५ हजार ११६

चेन्नई ४ हजार ६९६ ५ हजार १२३

पुणे ४ हजार ६९३ ५ हजार ११९

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे ?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT