1gold_20rates_20today.jpg 
अर्थविश्व

Gold Rate: लग्नसराईच्या आधी सोनं 42500 पर्यंत येण्याची शक्यता, 5 कारणांमुळे होतेय दरात घसरण

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली- सराफ बाजारात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. एप्रिलपासून सुरु होणाऱ्या विवाह मुहूर्तांदरम्यान हे शुभ संकेत आले आहेत. ज्यांना विवाह सोहळ्यासाठी सोने-चांदी खरेदी करायची आहे, त्यांच्यासाठी ही खरीच सुवर्णसंधी आहे. गुंतवणुकीसाठीही ही योग्य वेळ आहे. कारण सोने आपल्या सर्वोच्च पातळी 56254 वरुन सुमारे 11500 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत स्वस्त झाले आहे. सराफ बाजारात मागील 6 दिवसांत सोने 1603 रुपये आणि चांदी 4099 रुपयांनी कमी झाले आहे. गुरुवारी 4 मार्च रोजी सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 44843 रुपये झाला आणि येणाऱ्या दिवसांत हा दर 42500 पर्यंत येऊ शकतो. 

फेब्रुवारीत 3000 रुपयांनी कमी झाले दर
सोन्याच्या दरात फेब्रुवारीत सर्वाधिक घसरण दिसून आली. सराफ बाजारात सोन्याच्या दरात 3000 रुपयांची घट दिसून आली. सोने आपल्या सर्वोच्च दरापेक्षा 11500 रुपयांनी स्वस्त झाले आहे. दरातील घसरणीबाबत पाच मोठी कारणे सांगितली जात आहेत. पहिले कारण हे इम्पोर्ट ड्यूटीतील (आयात शूल्क) 2.5 टक्क्यांच्या कपातीचा थेट परिणाम सोने आणि चांदी बाजारावर पडत आहे. त्याचबरोबर दुसरे कारण हे डॉलर इंडेक्स. जेव्हा हा इंडेक्स कोसळतो तेव्हा सोन्याचा दर वाढलेला असतो. आता तो सावरताना दिसत आहे. डॉलर इंडेक्स आता 91 वर आला आहे. त्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. 

अमेरिकेत बाँड यील्ड वाढणे हे तिसरे कारण आहे. तो आता 1.4 टक्केवर पोहोचला आहे. जेव्हा बाँड यील्ड वाढते तेव्हा सोन्याचे दर नकारात्मक होते. लोकांमध्ये कोरोनाची भीती कमी होताना दिसत आहे. यामुळेही सोन्याच्या दरात सध्या घसरण होत आहे. चौथे सर्वात मोठे कारण हे ईटीएफमध्ये नफेखारी आणि पाचवे कारण हे गुंतवणुकीच्या दृष्टीने सर्वांत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोन्याऐवजी लोकांनी पैसे थोडे जोखिमीच्या ठिकाणी पसंती दर्शवली आहे. बिटक्वाईन आणि इक्विटी हा त्यातीलच एक प्रकार. बिटक्वाईन आणि इक्विटी दोन्हीमध्ये गुंतवणुकीचा कल वाढला आहे. सोने आणि चांदीच्या गुंतवणुकीचे प्रमाण कमी झाले आहे. चीन, सिंगापूर, हाँगकाँगमध्ये सोन्याची मागणी वाढली आहे. दर पडल्यामुळे देशांतर्गत बाजारात खरेदी वाढत आहे. तर चांदी 63000 ते 71000 दरम्यान राहू शकतो. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaghcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT