today gold prices
today gold prices 
अर्थविश्व

सोनं पुन्हा महागलं, जाणून घ्या आजची किंमत

नामदेव कुंभार

Gold Price Today, Gold Price Outlook, Gold Price Forecast : लागोपाठ दुसऱ्या दिवशी सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच त्रस्त होते. त्यातच कोरोनाचा मार अन् आता वाढणाऱ्या सोनं आणि चांदीच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य आणखीनच संकटात सापडले आहेत. Good Returns नं दिलेल्या माहितीनुसार, दोन जून, बुधवारी सोन्याच्या दरांमध्ये प्रतितोळा जवळपास 200 रुपयांनी वाढ झाली आहे. 22 कॅरेटच्या सोन्याची किंमत प्रति एक ग्रॅम 20 रुपयांनी वाढून 4,690 इतकी झाली आहे. मंगळवारी सोनं प्रति एक ग्रॅम 4,670 रुपये झालं होतं. 24 कॅरेटच्या एक ग्रॅम सोन्याची किंमत 20 रुपयांनी वाढ झाली आहे. 24 कॅरेटच्या सोन्याची किंमत प्रति एक ग्रॅम 4,810 रुपये झाली आहे. (Gold Price Today : Gold and Silver Prices Observe a Rise)

देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. सोन्यासोबतच चांदीच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. पाहूयात देशभरातील महत्वाच्या शहरांमध्ये सोन्याचं दर काय आहेत?

राजधानी दिल्ली (Delhi):

नवी दिल्लीमध्ये 22 कॅरेटच्या सोन्याची किंमत प्रति तोळा 46 हजार 980 इतकी झाली आहे. तर 24 कॅरेटच्या सोन्याची किंमत प्रति तोळा 50 हजार 980 इतकी झाली आहे. .

कोलकाता (Kolkata) :

22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याची किंमत 48,490 रुपये इतकी आहे. तर 24 कॅरेटच्या सोन्याची किंमत 50,970 रुपये झाली आहे.

चेन्नई (Chennai):

दक्षिण भारतामध्येही सोन्याच्या दरांमध्ये वाढ पाहायला मिळाली. बुधवारी चेन्नईमध्ये 22 कॅरेटच्या सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 46,390 रुपये इतकी झाली आहे. तर 24 कॅरेटच्या सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 50,600 रुपये झाली आहे.

मुंबई (Mumbai) :

गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर 22 कॅरेटच्या सोन्यासाठी प्रतितोळा 46,900 रुपये मोजावे लागतील. 24 कॅरेटच्या सोन्यासाठी प्रतितोळा 47,900 मोजावे लागतील. इतर मेट्रो शहराच्या तुलनेत मुंबईत सोन्याची किंमत कमी आहे.

Gold Exchange

चांदीच्या किंमतीमध्येही वाढ -

सोन्याप्रमाणे चांदीच्या दरांमध्येही वाढ पाहायला मिळाली. कोलकाता, दिल्ली, केरळ, लखनऊ, पुणे, जयपूर, वडोदरा आणि मुंबईमध्ये चांदीची किंमत प्रति किलो 72 हजार 600 रुपये इतकी झाली आहे. इतर महत्वाच्या शहराच्या तुलने दक्षिण भारतामध्ये चांदीचे दर जास्त आहेत. विजयवाडा, हैदराबाद, मदुराई, कोईम्बतुर आणि चेन्नईमध्ये चांदीची किंमत प्रति किलो 77 हजार 300 रुपये झाली आहे.

रुपयाची घसरण -

शेअर बाजार कोसळल्यानं आणि अमेरिकन डॉलरचा दर वाढल्यानं बुधवारी सुरुवातीच्या ट्रेडमध्ये रुपयाची किंमत घसरली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 27 पैशांनी कमी होऊन 73.17 रुपये प्रति डॉलर इतकी झाली. आंतरबँक परदेशी चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 73.13 इतका होता. आदल्या दिवशीच्या तुलनेत यामध्ये 27 पैशांची घसरण झाल्याचं दिसून येतं आहे. मंगळवारी रुपयाचा भाव 72.90 रुपये प्रति डॉलर इतक्या किंमतीवर स्थिर झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi on Pune Porsche Accident: पुणे पोर्शे दुर्घटनेवरून राहुल गांधींनी PM मोदींवर सोडलं टीकास्त्र, म्हणाले 'दोन भारत...'

Badminton Rankings: भारताच्या सात्विक-चिरागचा बॅडमिंटनमध्ये डंका कायम! पुन्हा मिळवला नंबर वनचा ताज

अबबऽऽऽ चक्क मिळाले 100 टक्के गुण! बुद्धिबळ खेळणाऱ्या तनिषाने 100 टक्के गुण मिळवत जिंकला 'बारावी'चा डाव

Nashik Accident News: इगतपुरीच्या भावली धरणात ५ जणांचा बुडून मृत्यू; मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश

RR vs RCB Eliminator : कोणता रॉयल होणार 'इलिमिनेट', धडाकेबाज RCB समोर राजस्थान कामगिरी सुधारणार का?

SCROLL FOR NEXT