gold
gold 
अर्थविश्व

Gold Price - सोन्याचे दर पुन्हा वाढले; चांदीही वधारली

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - गेल्या चार दिवसांपासून सोन्याचे दर स्वस्त होत असताना मंगळवारी मात्र वाढ बघायला मिळाली. दिल्लीतील सरफा बाजारात 15 डिसेंबरला सोन्याचे दर 514 रुपयांनी वाढले. तर चांदीही एक हजार रुपयांनी वधारली. एक किलो चांदीच्या दरात 1 हजार 46 रुपयांची वाढ झाली आहे. 

सोमवारी सोन्याचा दर 48 हजार 333 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता. तर चांदी 62 हजार 566 रुपये प्रति किलो इतकी होती. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीमुळे आणि रुपयाची घसरण झाल्यानं भारतात सोने आणि चांदीचे दर वाढले. 

दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 10 रुपयांनी वाढल्यानंतर 48 हजार 874 रुपयांवर पोहोचले. त्याआधी सोमवारी सोने 48 हजार 333 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वाढून 1845 डॉलर प्रति औंस इतका राहिला आहे. 

चांदीच्या दरातही मंगळवारी वाढ झाली. दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याची किंमत 1046 रुपयांनी वधारल्यानंतर दर 63 हजार 612 रुपये प्रति किलो इतका झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर 23.16 डॉलर प्रति औंस इतका झाला. 

डॉलरच्या तुलने रुपया 8 पैशांनी घसरल्यानं तो 73.63 वर पोहोचला आहे. तर सोने चांदीच्या आंतरराष्ट्रीय बाजारीतील किंमतीत वाढ झाल्यानं भारतीय बाजारात दोन्हींच्या किंमती वाढल्या. दरम्यान, कोरोना व्हॅक्सिनबाबत सकारात्मक बाबी घडत असल्यानंही सोन्याची दरवाढ थांबली आहे. 

ऑगस्ट महिन्यात सोन्याचा दर 56 हजार 254 रुपयांवर पोहोचला होता. चांदी 76008 रुपये प्रति किलो इतकी झाली होती. त्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT