Check Today's Gold Price Updates
Check Today's Gold Price Updates esakal
अर्थविश्व

Gold-Silver Price: सोनं स्थिर तर चांदी महागली, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसापासून सोने चांदीच्या किंमतीत चढ उतार दिसून येत आहे मात्र सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. लग्न समारंभाच्या या सीजनमध्ये सोन्याचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र दर गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार आज सोन्याचा दर स्थिर असून किंमतीत कोणतीही वाढ झाली नाही तर चांदी ५९,४०० रुपये प्रति किलोने विकली जात असून चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५९४ रुपये आहे

राज्यातील ही प्रमुख शहरातील सोन्याच्या किमती (२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम)

मुंबई - ४६,२५० रुपये

पुणे - ४६,३२० रुपये

नागपूर - ४६,३२० रुपये

नाशिक - ५०,५२० रुपये

राज्यातील काही प्रमुख शहरातील सोन्याच्या किमती (२४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम)

मुंबई - ५०,४५० रुपये

पुणे - ५०,५२० रुपये

नागपूर - ५०,५२० रुपये

नाशिक- ५०,५२० रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT