Gold Price 
अर्थविश्व

Gold Price Update : खुशखबर! लग्नसराईत सोन्याच्या किंमतीत आणखी घट

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण झाली  आहे. शनिवारी सराफ बाजारामध्ये संमिश्र ट्रेड पहायला मिळाला. सोन्याचा भाव 300 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत खाली आला तर चांदीचा भाव 100 रुपयांनी वाढलेला दिसून आला. जागतिक बाजारातील सोन्याच्या किंमतींचा प्रभाव भारतीय सराफ बाजारावर झालेला दिसून आला. 

शुक्रवारी सोन्याच्या किंमतींमध्ये 21 रुपयांच्या तेजीची नोंद झाली. ज्यानंतर आता सोने 49,644 रुपये प्रति 10 ग्रॅमवर जाऊन पोहोचले आहे. तर 259 रुपयांच्या घसरणीसह चांदी 66,784 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचले आहे. याआधी गुरुवारी दिल्लीच्या सराफ बाजारामध्ये 194 रुपयांच्या तेजीसह सोने 49,544 रुपये प्रति ग्रॅम झालं होतं. तर 1,184 रुपयांच्या तेजीसह चांदी 66,969 रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. तर बुधवारी सोने 49,261 रुपये प्रति 10 ग्रॅमवर तर चांदी 65,785 रुपये प्रति किलो होते.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सोन्याच्या किंमतीत वाढत्या जागतिक निर्देशांमुळे भारतीय सराफ बाजारातही वाढ दिसून येत आहे. भारतीय सराफा बाजाराच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कमकुवत डॉलरमुळे सोन्याच्या किंमतीतील हे चढ-उतार सध्या दिसून येत आहेत. जागतिक बाजारात सोन्याची किंमत 0.80 डॉलरवरुन घसरुन 1889.60 डॉलर प्रति औंस वर होते. तर चांदी 0.42 टक्क्यांनी घसरुन 26.07 डॉलर प्रति औंसवर राहिली आहे.

या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर सराफ बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत वाढ झाली असली तरी त्याची किंमत आणखी कमी होईल. जागतिक अर्थव्यवस्थेतील सुधार आणि अमेरिका आणि चीनमधील तणाव कमी होत असल्यामुळे गुंतवणूकदार सोन्याऐवजी शेअर बाजार सोडत आहेत. हेच कारण आहे की नजीकच्या भविष्यात सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ संभव नाहीये. तसेच दीर्घकालीन काळासाठी सोने हा एक चांगला गुंतवणूक पर्याय मानला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

SCROLL FOR NEXT