अर्थविश्व

सोने पुन्हा चकाकले; 37 हजारांकडे वाटचाल

वृत्तसंस्था

भावाने गाठली ऐतिहासिक उच्चांकी पातळी 
नवी दिल्ली:  सोन्याच्या भावाने सोमवारी ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली. येथील सराफा बाजारात सोन्याचा भाव आज प्रति दहा ग्रॅम 36 हजार 970 रुपयांवर गेला. चांदीच्या भावात आज प्रति किलोमागे एक हजार रुपयांची वाढ होऊन तो 43 हजार 100 रुपयांवर गेला. 
अमेरिका -चीन व्यापारयुद्धाचा भडका उडण्याच्या शक्‍यतेने जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांचा ओढा सोन्याकडे वाढल्याने भावात आज वाढ झाली. अमेरिका-चीनमधील व्यापारी तणाव वाढल्यामुळे सोन्याचा भाव आज मे 2013 नंतरच्या उच्चांकी पातळीवर पोचला. स्थानिक सराफांकडूनही सोन्याला मागणी वाढल्याचाही परिणाम भावावर झाला. 

अमेरिकेने चीनच्या 300 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क आकारले आहे. हे शुल्क 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. यामुळे जागतिक पातळीवर व्यापार युद्धाचा भडका उडण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. यामुळे गुंतवणूकदारांकडून सोन्याच्या खरेदीवर भर दिला जात आहे. यामुळे सोन्याच्या भावाने आज उसळी घेतली. डॉलरच्या तुलनेतर रुपयात झालेली मोठी घसरणही भाववाढीस कारणीभूत ठरली. 

सोन्याचा भाव (नवी दिल्ली) 
प्रति दहा ग्रॅम ः 36,970 

चांदीचा भाव 
एक किलो ः 43,100

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jowar-Bajra Price Hike : थंडीची चाहूल, ज्वारी-बाजरीला मागणी; बाजारात क्विंटलमागे २०० ते ५०० रुपयांची तेजी

Latest Marathi Breaking News Live : नागपूरमध्ये मोठी राजकीय हालचाल! माजी आमदार बळीराम भाऊ शिरस्कार भाजपात प्रवेश; स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण

Cooking In Space: चिनी अंतराळवीरांनी अंतराळात शिजविले अन्न; अवकाश स्थानकात ताजे जेवण बनविण्याचा प्रयोग यशस्वी

Aundh Hospital Theft : औंध रुग्णालयातून 'शेड्यूल-एच' औषधाच्या २० बाटल्या लंपास; वर्ग ४ कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Arunachal Monorail: कामेंग खोऱ्यामध्ये धावणार मोनोरेल; अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराच्या ‘गजराज कोअर’ची कमाल

SCROLL FOR NEXT