gold 
अर्थविश्व

Gold rate today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- सोमवारी सकाळी 181 रुपयाच्या घसरणीसह सोन्याची (Gold) किंमत 48786 रुपये प्रति ग्रॅमने सुरु झाली. सकाळी 10 वाजता याची किंमत 222 च्या घसरणीसह 48745 रुपयांवर ट्रेंड करत आहे. सकाळी सोन्याने 48635 रुपयांचा किमान आणि 48827 रुपयांचा कमाल स्तर गाठला. 

याआधी शुक्रवारी सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मौल्यवान धातूंच्या किंमतीमधील घसरण यामागचे कारण होते. यूएस बाँड यील्ड आणि अमेरिकी डॉलर मजबुत झाल्याने सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये घट झाली. शुक्रवारी एमसीएक्सवर फेब्रुवारी डिलीवरीचे सोने 2086 रुपयांच्या म्हणजे 4.06 टक्क्यांच्या घसरणीसह 48818 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला होता. मार्च डिलीवरीच्या चांदीमध्येही 6112 रुपये म्हणजे 8.74 टक्क्यांच्या घसरणीसह दर 63850 रुपये प्रति किलो झाला होता. 

Stock Market: सेन्सेक्स आणि निफ्टी ऐतिहासिक उंचीवर; गुंतवणुकदारांची झाली चांदी

2020 मध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. 2019 मध्येही सोन्याचे भाव वाढले होते आणि आता 2021 मध्येही सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजारांच्या आसपास आहे, पण 2021 मध्ये सोन्याला भाव येण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार 2021 वर्ष सोन्यासाठी चांगले राहिल. यावर्षी सोन्याची किंमत 63,000 रुपये प्रति ग्रॅमपर्यंत जाऊ शकते. 

सोन्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असल्यास तुम्हाला आता चांगली संधी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सोन्याची किंमत 28 टक्क्यांनी वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात सोने-चांदीने नवा रिकॉर्ड स्थापित केला होता आणि आपला ऑल टाईम हाय स्तर गाठला होता. भारतामध्येच सोन्याची किंमत वाढतेय असे नाही तर जगभरात सोन्याच्या किंमती वाढत आहेत. यावर्षी जागतिक बाजारात सोने जवळजवळ 23 टक्क्यांनी वाढले. 2019 मध्ये सोन्याची दर वाढ डबल डिजिटमध्ये होती, 2021 मध्येही ती डबल डिजीटलमध्ये आहे. 

WhatsApp वरुन Signal वर ट्रान्सफर होताय? ग्रुप आहे तसा हलवण्याची ही वाचा सोपी...

दरम्यान, नव्या वर्षाची सुरुवात सोनेरी गुंतवणुकीने करण्यासाठी सार्वभौम सुवर्ण रोख्यांची अर्थात सॉव्हरिन गोल्ड बाँड्‌सची संधी पुन्हा मिळत आहे. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2020-21१ मधील सार्वभौम सुवर्ण रोख्यांची दहावी मालिका जाहीर केली आहे. 11 जानेवारी 2021 पासून या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे.

स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि निवडक टपाल कार्यालयांतून हे रोखे विक्रीसाठी उपलब्ध असतील. तसेच स्मॉल फायनान्स बँका व पेमेंट बँका वगळता अन्य सर्व बँकांतून आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजार (बीएसई) येथूनही सुवर्ण रोख्यांची खरेदी करता येते. हे बाँड फक्त वैयक्तिक, एचयूएफ, ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्थांनाच घेता येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray: कोण होत्या मीनाताई ठाकरे? बाळासाहेबांच्या झंजावात राजकारणात होता सिंहाचा वाटा

Nagpur Municipal Corporation: 'नागपूर मनपा निवडणुकीला महागाईचा फटका'; २० कोटींचा अंदाजित खर्च, २४ लाखांहून अधिक मतदार

Nano Banana AI Durga Puja 2025 Saree Look Prompts: 'हे' 5 प्रॉम्प्ट कॉपी करा अन् जनरेट करा फेस्टिव्हल साडी लूक

Bhosari MIDC : भोसरी एमआयडीसी पोलिसांचा पर्यावरणासाठी पुढाकार, देशी वृक्षांची लागवड

Mumbai Local Viral Video: दिव्यांगजन कोचमध्ये सामान्य प्रवाशांची घुसखोरी, आरक्षित डब्ब्यात चढण्यासाठी दृष्टिहीनांचे हाल

SCROLL FOR NEXT