Today's Gold Silver Price Sakal
अर्थविश्व

Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात आणखी वाढ; जाणून घ्या आजची किंमत

ऐन लग्नसराईत सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gold-Silver Price Today: गेल्या काही दिवसांपासून जगातील अस्थिरतेचं वातावरण तसेच रशिया आणि युक्रेन यांच्यात 86 दिवसांपासून सुरू असलेले युद्ध यादरम्यान भारतासह जगभरातील सराफा बाजारात मोठा परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने-चांदीची गुंतवणूकदारांकडून वाढलेली मागणी तसेच देशात लग्नसराईच्या हंगामामुळे दागिन्यांची मागणी यांमुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज मुंबईत १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ४७.०५० रुपये होती. काल ही किंमत ४६,७०० रुपये प्रति १० ग्रॅम होती. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,३३० प्रतितोळा आहे. तसेच चांदी ६१,४०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran War Victory : अमेरिकेने युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा, म्हणाले- इराणने आम्हाला मोठं गिफ्ट पाठवलं

Hotel Close Ratnagiri : रत्नागिरीत २५० हॉटेलचे ‘शटर बंद’, शिवभोजन थाळीही बंद सर्वसामान्यांची फरफट

Latest Marathi News Live Update : 'आप'चे आमदार पठाणमाजरा यांना ग्वाल्हेरमधून अटक

IPL 2026: मुंबईत सर्व IPL कर्णधारांची बैठक; इम्पॅक्ट खेळाडू, आचारसंहिता आणि नवीन नियमांची चर्चा होणार

'पुष्पा 2 मध्ये काम केल्याचा मला पश्चाताप' प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली...'मला ते पाहून धक्काच बसला...'

SCROLL FOR NEXT