Todays Gold Silver Update  sakal
अर्थविश्व

Gold-Silver Price: घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात तेजी, जाणून घ्या नवे दर

आज घसरणीला ब्रेक लागला असून सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे तर चांदीचे दर मात्र आणखी घसरले.

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याच्या सुरवातीपासून सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली होती. गुरुवारीसुद्धा सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली. मात्र आज या घसरणीला ब्रेक लागला असून सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे तर चांदीचे दर मात्र आणखी घसरले.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,750 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,000 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 573 रुपये आहे. (gold silver price update 14 october 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 51,930 रुपये

  • दिल्ली - 51,150 रुपये

  • हैदराबाद - 51,000 रुपये

  • कोलकत्ता - 51,100रुपये

  • लखनऊ - 51,150 रुपये

  • मुंबई - 51,100 रुपये

  • नागपूर - 51,030 रुपये

  • पुणे - 51,030 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FACT CHECK : पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ICC कडून एका वर्षाच्या बंदीची कारवाई? PSL वर बंदी, महसूलात कपात अन् बरंच काही...

Pune BJP Respects Ajit Pawar : पुण्याच्या महापौर-उपमहापौर निवडीनंतर भाजप जल्लोष करणार का? अजित पवारांच्या निधनामुळे घेतला मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अस्थिकलश सांगलीमध्ये दाखल

Who is Parshuram Wadekar? : कोण आहेत पुण्याचे उपमहापौर परशूराम वाडेकर? धीरज घाटे यांनी केली घोषणा!

"मला एकही फोन न करता देवाघरी गेली" प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला मातृशोक ; दोन महिन्यापूर्वीच झालेलं लग्न

SCROLL FOR NEXT