gold and silver rate sakal
अर्थविश्व

Gold Rate: खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी! सोन्या-चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर

या आठवड्यात तर सोने चांदीच्या दरात लक्षणीय घसरण दिसून आली.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. या आठवड्यात तर सोने चांदीच्या दरात लक्षणीय घसरण दिसून आली. आज मंगळवारी सुद्धा सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे.

आज सोने आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,540 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,770 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 589 रुपये आहे. (gold silver price update 2 november 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 51,590 रुपये

  • दिल्ली - 50,920 रुपये

  • हैदराबाद - 50,770 रुपये

  • कोलकत्ता - 50,770 रुपये

  • लखनऊ - 50,920 रुपये

  • मुंबई - 50,770 रुपये

  • नागपूर - 50,800 रुपये

  • पुणे - 50,800 रुपये

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sankeshwar Banda Road Toll Plaza : संकेश्वर -बांदा रोडवरील आजऱ्याचा टोल हलणार; नितीन गडकरींचे आदेश, प्रकाश आबिटकरांनी दिली माहिती

१० वर्षांच्या भावाने शतक ठोकताच श्रीलंकेतून वैभव सूर्यवंशीची मोठी प्रतिक्रिया; इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हणाला...

पेंच व्याघ्र प्रकल्पात AI आधारित 'टायगर अलार्म सिस्टम'; वाघ येण्याआधी सायरन वाजणार; नेमकी यंत्रणा काय?

Latest Marathi News Live Update : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचाल करणे दुचाकी स्वराला उडवलं, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

आणखी एका मराठी अभिनेत्रीची 'धमाल ४' मध्ये एंट्री; करणार अजय देवगनसोबत काम, भूत बनलेल्या अभिनेत्रीला ओळखलंत का?

SCROLL FOR NEXT