Gold silver price Gallery
अर्थविश्व

Gold Silver Price: सोन्याच्या घसरणीला ब्रेक! दरात तेजी, जाणून घ्या आजचे नवे दर

आज सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात प्रचंड घसरण दिसून आली होती मात्र आज सोने चांदी दराच्या घसरणीला ब्रेक लागला असून तेजी दिसून येत आहे. आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 45,950 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,130 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 572 रुपये आहे. (gold silver price update 21 september 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई - 50,510 रुपये

दिल्ली - 50,290 रुपये

हैदराबाद - 50,130 रुपये

कोलकत्ता - 50,020 रुपये

लखनऊ - 50,290 रुपये

मुंबई - 50,130 रुपये

नागपूर - 50,130 रुपये

पूणे - 50,130 रुपये

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : कारच्या एअरबॅगचा ब्लास्ट, चालक तरुणाचा मृत्यू

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २७ जून २०२६ ते ३ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

निवडणुकीतील पराभवानंतर विरोधकांमध्ये फूट! मोठ्या पक्षाने ९ वर्षांची साथ सोडत युती तोडली; राजकीय गणित बिघडले

SCROLL FOR NEXT