gold rate google
अर्थविश्व

Gold Rate : खरेदीकरांसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे नवे दर

सोन्याच्या दरातील घसरणीमुळे सोने खरेदीकडे लोकांचा कल दिसून येईल.

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याच्या सुरवातीपासून सोने चांदीच्या दरात स्थिरता दिसून येत होती. मात्र आज सोन्याच्या दरात घसरण दिसून येत असून चांदीचे दर मात्र स्थिर आहे. सोन्याच्या दरातील घसरणीमुळे सोने खरेदीकडे लोकांचा कल दिसून येईल.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,460 तर 24 कॅरेट साठी 52,880 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 614 रुपये आहे. (gold silver price update 25 November 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 53,630 रुपये

  • दिल्ली - 53,040 रुपये

  • हैदराबाद - 52,880 रुपये

  • कोलकत्ता - 52,880 रुपये

  • लखनऊ - 53,040 रुपये

  • मुंबई - 52,880 रुपये

  • नागपूर - 52,880 रुपये

  • पुणे - 52,880 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : शिवाजीनगर हत्या प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य आरोपी नदीमचा साथीदार 'रिझवान DJ'ला अटक, 40 लाखांचे अमली पदार्थ जप्त

Pune News: महसूल विभागाचा निर्णय! राज्यातील ११ अपर जिल्हाधिकारी, ६९ अपर तहसील कार्यालयांची नव्याने होणार निर्मिती..

मालवणच्या समुद्रकिनारी एकाचवेळी ७५ डॉल्फिनचा कळप, ड्रोनने टिपले दुर्मिळ आणि विहंगम दृश्य; पाहा VIDEO

Ration Shop Onion Supply : रेशन दुकानात मिळणार स्वस्त कांदा, कृषी मूल्य आयोग उपसमितीचा अहवाल; अतिरिक्त पुरवठाकाळातील प्रभावी उपाय

Latest Marathi News Live Update : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन, सिल्लोड येथे आज अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT