Todays Gold, Silver price Updates SAKAL
अर्थविश्व

Gold-Silver Price: नवरात्रीत सोनं महागलं! जाणून घ्या आजचे नवे दर

आज सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून आली होती. गुरुवारी सोने चांदीचे दर तर स्थिर होते मात्र आज सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. त्यामुळे ऐन नवरात्रीत असं अचानक सोनं वाढल्याने सोने खरेदींकरांसाठी हा खुप मोठा फटका असणार.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,400 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,620 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 564 रुपये आहे. (gold silver price update 30 september 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई - 51,050 रुपये

दिल्ली - 50,780 रुपये

हैदराबाद - 50,620 रुपये

कोलकत्ता - 50,620 रुपये

लखनऊ - 50,780 रुपये

मुंबई - 49,970 रुपये

नागपूर - 50,650 रुपये

पूणे - 46,430 रुपये

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या पहिल्या सामन्यासाठी संजू सॅमसनला संधी, तर इशान किशन, कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

Lonavala: दुर्गा श्वानामुळे सापडला ४०० फूट खोल दरीतला मृतदेह; ड्रोन तंत्रज्ञानाचीही झाली मोठी मदत

Paschim Maharashtra Temple Recruitment 2026: पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरांसाठी लवकरच भरली जाणार नवी पदे; बक्कळ पगार अन् मिळणार ही सुविधा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील विमाननगर परिसरात जोरदार राडा

कोण्या दिग्गज व्यक्तीने नाही तर 'या' माणसाने दादा कोंडकेंना दाखवली पांडू हवालदार सिनेमातील मोठी चूक

SCROLL FOR NEXT