Today's Gold Price Updates
Today's Gold Price Updates Sakal
अर्थविश्व

Gold-Silver Price : ऐन लग्नसराईत सोनं-चांदी महागलं, जाणून घ्या आजचा दर

सकाळ डिजिटल टीम

Gold-Silver Price Today: जागतिक परिस्थितीमुळे सोन्या-चांदीच्या दरात गेल्या आठवड्यापासून अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत, तुम्हालाही सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचे असतील किंवा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू होती. मात्र लग्नसराईच्या हंगामात त्याची मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे. bankbazaar.com नुसार, देशात आज 22 कॅरेट सोने 47,430 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. तर 24 कॅरेट सोने 49,800 रुपये प्रतितोळा दरानं विकलं जात आहे.

सोन्याच्या किमतीत वाढ-

BankBazaar.com नुसार, सोन्याच्या किमतीत गेल्या आठवड्यात अनेक वेळा घसरण झाली होती. मात्र आज सोन्याच्या दरात थोडीशी उसळी आली आहे. भोपाळच्या सराफा बाजारात काल 22 कॅरेट सोने प्रतितोळा 47,230 रुपयांना विकले गेले. आज सोन्याचा दर 47,430 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, जर आपण कालच्या 24 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचं झालं, तर काल 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 49,590 रुपये प्रति विकले गेले, आज 49,800 रुपये प्रति 10 ग्रॅम विकले जात आहे.

चांदीच्या किमतीत वाढ-

सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. म्हणजेच मंगळवारी सराफा बाजारात एक किलो चांदीचा भाव 64,500 रुपये होता, तर आज 65,400 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT