Check Today's Gold Silver Price Updates Sakal
अर्थविश्व

Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजची किंमत

लग्नसराईमुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gold-Silver Price Today: रशिया आणि युक्रेन यांच्यात 86 दिवसांपासून सुरू असलेले युद्ध आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरता यादरम्यान भारतासह जगभरातील सराफा बाजारात मोठा परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने-चांदीची गुंतवणूकदारांकडून चांगली मागणी असल्यामुळे शुक्रवारी फ्युचर्सने उसळी घेतली. कॅमेक्सवर सोन्याचा भाव 11 डॉलरने वाढून 1849 डॉलर प्रति औंस झाला आणि चांदीही 55 सेंटने वाढून 22.07 डॉलर प्रति औंस झाली. त्यामुळे देशात सोन्याचा भाव 350 रुपयांनी वाढून 52350 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचा भाव 1,100 रुपयांनी वाढून 63,300 रुपयांवर पोहोचला. मात्र, लग्नसराईसाठी दागिन्यांची मागणी बाजारात तशीच आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya: रामनवमीला रामललाचा 'सूर्याभिषेक'! दुपारी १२ वाजता सूर्यकिरणे कपाळावर चमकणार; शास्त्र आणि तंत्रज्ञानाचा अद्भूत सोहळा!

Mahavitaran: महावितरणच्या वीज सेवांचा डिजिटल धमाका! बिल पाहणे, भरने आणि तक्रार नोंदवणे आता व्हॉट्सॲपवर शक्य

Jalna News: रुग्णवाहिकांच्या इंधनाचा उद्‍भवणार प्रश्न; पेट्रोल पंपधारकांना क्रेडिटवर डिझेल पेट्रोल बंद झाल्याने उधारी बंद होणार

Ashok Kharat Fraud : अशोक खरात की लक्ष्मण? नाशिकच्या भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर; दहावी मार्कशीटमधील 'या' आकड्यांनी उडाली खळबळ, कसं बदललं नाव?

Ashish Shelar: ‘मराठी’साठी चित्रनाट्यगृह उभारणार, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांची घोषणा

SCROLL FOR NEXT