silver and gold sakal
अर्थविश्व

Gold-Silver Rate : सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

गुंतवणूकदार स्थिर गुंतवणूकीसाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे बाकीचे देशही सतर्क झाले आहेत. याचा परिणाम सोन्याच्या दरावर दिसून येत आहे. कारण गुंतवणूकदार स्थिर गुंतवणुकीसाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत.

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. त्यामुळे सध्या बाजारात सोन्याची वाढती मागणी आहे. याचा परिणाम म्हणजे आज सोन्याच्या दरात विक्रमी वाढ दिसून येत आहे तर चांदीचे दरही महागले आहेत. (Gold Silver Price)

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 50,260 तर 24 कॅरेटचा 54,830 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 701 रुपये आहे. (gold silver price update 22 December 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 55,830 रुपये

  • दिल्ली - 54,830 रुपये

  • हैदराबाद - 54,660 रुपये

  • कोलकत्ता - 54,660 रुपये

  • लखनऊ - 54,830 रुपये

  • मुंबई - 54,660 रुपये

  • नागपूर - 54,660 रुपये

  • पुणे - 54,660 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Expansion : मोदी कॅबिनेटमध्ये होणार मोठा गेमचेंजर! सर्वांच्या नजरा 'या' दोन नावांवर, अमित शाहांच्या भेटीनंतर दिल्लीत खळबळ!

Pali Flyover Construction Update : 34 ते 35 खांब आणि नवा आराखडा! मुंबई-गोवा हायवेवरील पाली उड्डाणपूल कधी सुरू होणार? समोर आली मोठी अपडेट

FIFA World Cup: पुण्यापेक्षाही लहान देश, पण पराक्रम गाजवलाय मोठा! पदार्पणातच गाठली नॉकआऊट, आता मेस्सीच्या अर्जेंटिनाला देणार टक्कर

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

SCROLL FOR NEXT