Gold Silver Today's Price Updates esakal
अर्थविश्व

खूशखबर! सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजची किंमत

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण झाल्याने ही स्थिती असल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ डिजिटल टीम

देशभरात आज सोन्याचा दर किलोमागे तब्बल चार हजार रुपयांनी घसरला. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण झाल्याने ही स्थिती असल्याचे पाहायला मिळाले. भारतात (India) १० ग्राम २२ कॅरेट सोन्याची किंमत (Gold Rate) ४५,५०० रुपये झाली आहे. मागील ट्रेडमध्ये या या मौल्यवान धातूची किंमत ४५,९०० रुपये प्रति ग्रॅमवर बंद झाली. दिल्लीत सोन्याचा दर ४५,५०० रुपये होता. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी (Sliver Rate) ६३,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.(Gold Silver Today's Price Updates)

जाणून घ्या आजचा भाव

मुंबईमध्ये (Mumbai) २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,५०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,६४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात (Pune) प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,५०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,६५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,५०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,४५० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६३२ रुपये आहे. या किमती स्थानिक किमतींशी जुळत नाहीत कारण यामध्ये GST, TCS आणि इतर कर समाविष्ट नाहीत. देशभरातील विविध शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या या किमती आहेत. हे दर गुड रिटर्न्स या वेबसाइटवरून घेतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 1st Test: देवदत्त पडिक्कलची सेन्चुरी हुकली, पण केएल राहुलसोबतच्या दीडशतकी भागीदारीनं घडवला इतिहास

Marathwada Cold : मराठवाड्यात थंडीचा कडाका, उदगीरचे तापमान १०.७ अंशांवर

Latest Marathi News Live Update : वाळवा पंचायत समितीत ‘स्वीकृत’साठी पाच उमेदवार; पाटील, मगदूम, बेनाडे, सावंत, घनवट यांचे अर्ज

जिमसाठी अन्न परवाना बंधनकारक, एफडीएचे नियम; 'एफएसएसएआय'कडे नोंदणी आवश्यक

३४ आठवड्यांची गर्भवती ४२ किमी धावली; वर्षभरात ७ मोठ्या मॅरेथॉन केल्या पूर्ण, वडिलांकडून मिळालेली प्रेरणा

SCROLL FOR NEXT