Todays Gold and silver prices sakal
अर्थविश्व

Gold-Silver Price: सोने महागलं तर चांदी स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

आज पुन्हा आठवड्याच्या सुरवातीला सोन्यात घसरण दिसून आली आहे तर चांदी मात्र स्थिर आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदी्च्या दरात चढ उतार दिसून येत आहे. महिन्याच्या सुरवातीच्या दोन दिवसात सोने चांदीत घसरण होत असताना शुक्रवारला या घसरणीला ब्रेक लागला होता मात्र आज पुन्हा आठवड्याच्या सुरवातीला सोन्यात घसरण दिसून आली आहे तर चांदी मात्र स्थिर आहे.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,740 रुपये तर 24 कॅरेट साठी 52,090 रुपये आहे तर चांदीचा दर स्थिर असून 10 ग्रॅम चांदीचा दर आज 617 रूपयावर कायम आहे. (Today's Gold, Silver Price Updates)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - रुपये

दिल्ली - 52,090 रुपये

हैदराबाद - 52,090 रुपये

कोलकत्ता - 52,090 रुपये

लखनऊ - 52.240 रुपये

मुंबई - 52,090 रुपये

नागपूर - 52,140 रुपये

पूणे - 52,140 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Marathwada Vidarbha : बंडखोर खासदारांच्या मतदार संघात उद्धव ठाकरे शड्डू ठोकणार; मराठवाडा ते विदर्भ दौरा ठरला

Germany vs Ivory Coast: दोन गोल अपात्र ठरवले, तरी जर्मन्स नाही खचले; भरपाई वेळेत आयव्हरी कोस्टावर रोमहर्षक विजय

Maharashtra Politics: अमित शहांचं भाषण सुरू असताना पवनराजे निंबाळकर हत्येचा निकाल, एक फोन अन्‌ शिंदे ताडकन उठले

Father's Day Wishes in Marathi: "न बोलता प्रेम व्यक्त करणारा व्यक्ती म्हणजे बाबा!" फादर्स डे निमित्त बाबांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि प्रेमळ संदेश!

Arabian Sea Cyclonic Circulation : अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती, २५ जूनपासून पावसाला होणार सुरूवात; १ जुलैपासून मॉन्सून पूर्णपणे सक्रिय

SCROLL FOR NEXT