rates of gold and silver 
अर्थविश्व

पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात तेजी, एक तोळा मिळतोय कितीला ?

सोन्याची किंमत आतापर्यंत जवळपास ९ हजार रुपयाने खाली आली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करित असाल तर हिच ती योग्य वेळ आहे.

सकाळ डिजिटल टीम

आज सोमवारी सोन्याच्या किंमतीत किरकोळ वाढ पाहायला मिळत आहे. MCX वर डिसेंबर डिलिव्हरी सोने आज सात रुपयांच्या वाढीसह खुले झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत हाच ट्रेड होता. सकाळच्या सत्रात सोन्याने ४७ हजार २२० रुपयांच्या किमान आणि ४७ हजार ३५० रुपयांच्या कमाल स्तर गाठले होते. दुसरीकडे डिसेंबर डिलिव्हरी चांदी १४० रुपयाने तेजीसह ६३ हजार ४११ रुपये प्रतिकिलोच्या भावावर ट्रेड (Gold Price) होत होते.

जवळपास ९ हजारांनी स्वस्त झाले सोने

सोन्याच्या किंमतीत भले आज किरकोळ वाढ दिसत आहे. मात्र खूप वेळेनंतर सोने जवळपास ९ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोने ५६ हजार २०० रुपयांसह आपल्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. आता सोने ४७ हजार २०० रुपये प्रति दहा ग्रॅम पातळीवर पोहोचले आहे. या प्रमाणे सोन्याची किंमत आतापर्यंत जवळपास ९ हजार रुपयाने खाली आली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करित असाल तर हिच ती योग्य वेळ आहे.

गेल्या वर्षी सोन्याने किती दिला होता परतावा ?

गेल्या वर्षी सोन्यातून २८ टक्के परतावा (रिटर्न) मिळाला आहे. त्याच्या गेल्या वर्षीही सोन्याचा परतावा २५ टक्के होता. जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर सोन्यात आताही गुंतवणूक करणे खूपच सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे. त्यातून चांगला परतावा मिळतो. मागील वर्षांमध्ये सोन्यातून मिळालेला परतावा तुमच्या समोर आहे. त्यातून दिसते की गुंतवणूक करणे हे फायद्याचेच आहे.

आगामी काय आहे अंदाज?

तज्ज्ञांनुसार, वर्षाच्या शेवटच्या महिन्यांमध्ये सोने नवीन रेकाॅर्ड नोंदवू शकते. अमेरिकेचा इकोनाॅमिक डेटा आणि कच्च्या तेलाचे वाढत्या किंमतीमुळे महागाईच्या चिंतेतून सोन्यासाठी उत्प्रेरकाचे काम करु शकते. या व्यतिरिक्त सणोत्सव, विवाहाच्या काळात सोन्याच्या किंमती वाढवू शकते. चीनमध्ये सुरु असलेल्या वीज संकटामुळे इक्विटी गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणुकीकडे वळू शकतात. मात्र अमेरिकन डाॅलरच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किंमतींवर दबाव राहण्याची शक्यता आहे.

गोल्ड ईटीएफमध्ये ४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक

गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड कोशामध्ये (ईटीएफ) सप्टेंबरमध्ये ४४६ करोड रुपयांची गुंतवणूक झाली. देशातील सणोत्सवाचा विचार करता हा प्रवाह आताही सुरु राहण्याची आशा आहे. गेल्या महिन्यात गोल्ड इटीएफमध्ये २४ कोटी रुपयांची शुद्ध गुंतवणूक आली होती. असोसिएशन ऑफ म्युचल फंड्स इन इंडियाच्या (एम्फी) आकड्यानुसार जुलैत गोल्ड इटीएफमधून गुंतवणुकदारांना ६१.५ कोटी रुपये मिळाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT